मुंबई - काँग्रेसकडून आज लोकसभा निवडणूक लढणाऱ्या राज्यातील उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण नांदेडमधून, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे वाशिम यवतमाळातून तर वर्ध्यातून चारुलता टोकस यांचे नावं पक्के झाल्याचे बोलले जात आहे.
सोबतच चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून विलास मुत्तेमवार, धुळ्यातून कुणाल पाटील, रामटेकमधून किशोर गजभिये आणि अकोल्यातून डॉ. अभय पाटील यांच्या नावाची वर्णी लागल्याचे बोलले जात आहे. नांदेडमधून अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण लढणार असल्याची चर्चा आहे. मात्र, पक्ष कार्यकर्त्यांकडून अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक लढवाण्याचा आग्रह केला जात असल्याचेही म्हटले जात आहे.
यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता
अशोक चव्हाण - नांदेड
चंद्रपूर - विलास मुत्तेमवार
वर्धा - चारुळता टोकस
अकोला - अभय पाटील
धुळे - कुणाल पाटील
रामटेक- किशोर गजभिये
वाशिम - यवतमाळ - माणिकराव ठाकरे