ETV Bharat / state

IT Raid On Yashwant Jadhav : यशवंत जाधव यांच्यावरील कारवाईनंतरही शिवसेना गप्प का?; शिवसेनेचा आक्रमकपणा गेला कुठे?

आघाडी सरकारमधील दोन नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांकडून कारवाई करण्यात आली. ( Ed Action on Maharashtra Minister ) या कारवाई दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक ( NCP Minister Nawab Malik ) यांच्यावरील कारवाईनंतर ज्याप्रमाणे निषेध करण्यात आला, आंदोलने करण्यात आली त्याचप्रमाणे निषेध आणि आंदोलने शिवसेना पक्षातील उपनेते व स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव ( Shivsena Leader Yashwant Jadhav Mumbai ) यांच्यावरील कारवाईनंतर दिसून आलेले नाही. ( IT Raid On Yashwant Jadhav Mumbai )

Yashwant Jadhav
यशवंत जाधव
author img

By

Published : Mar 1, 2022, 4:33 PM IST

मुंबई - आघाडी सरकारमधील दोन नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांकडून कारवाई करण्यात आली. ( Ed Action on Maharashtra Minister ) या कारवाई दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक ( NCP Minister Nawab Malik ) यांच्यावरील कारवाईनंतर ज्याप्रमाणे निषेध करण्यात आला, आंदोलने करण्यात आली त्याचप्रमाणे निषेध आणि आंदोलने शिवसेना पक्षातील उपनेते व स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव ( Shivsena Leader Yashwant Jadhav Mumbai ) यांच्यावरील कारवाईनंतर दिसून आलेले नाही. ( IT Raid On Yashwant Jadhav Mumbai ) यामुळे आघाडी सरकारमध्ये मुख्य पक्ष असताना शिवसेना गप्प का बसली, शिवसेनेचा आक्रमकपणा कुठे गेला? असे प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केले जात आहेत.

शिवसेनेचा आक्रमकपणा कुठे गेला -

मुंबईत गेल्या दहा दिवसांत राज्यातील आघाडी सरकारमधील दोन नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. या अटकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना या सर्वच पक्षांनी निषेध नोंदवला. राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलने करण्यात आली. सर्वपक्षीय मंत्री, आमदार यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ उपोषणही केले. यांच्याच दोन दिवसांनी शिवसेनेचे उपनेते व मुंबई महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव व त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांच्या घरी आयकर विभागाने छापा टाकला.

हेही वाचा - Nilesh Rane allegations over Nawab Maliks : नवाब मलिक हेच दाऊदचे फ्रंट मॅन असू शकतात - निलेश राणे

तब्बल चार दिवसांत ७२ तास ही छापा सुरू होता. याचा स्थानिक माझगाव मधील शिवसैनिकांनी निषेध नोंदवला. खासदार संजय राऊत, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर, नगरसेवक रमाकांत रहाटे, मनोज जामसूदकर यांनी याचा निषेध केला. इतर कोणत्याही शिवसेनेच्या नेत्यांनी निषेध नोंदवलेला नाही. नवाब मलिक यांच्यासाठी ज्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरली तशी शिवसेना केंद्रीय यंत्रणेच्या विरोधात रस्त्यावर उतरलेली नाही. यामुळे शिवसेनेचा आक्रमकपणा कमी झाला का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच सरकारमध्ये शिवसेना एकाकी पडली का? की यशवंत जाधव यांना एकाकी पाडण्यात आले? असे प्रश्न पालिकेतील वरिष्ठ पत्रकार सुनिल शिंदे यांनी उपस्थित केला आहे. तर आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीचा वरचष्मा असल्याचे दिसून येत आहे, अशी प्रतिक्रिया वरिष्ठ पत्रकार श्रीरंग सुर्वे यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.