मुंबई - गेल्या ५ वर्षातील फडणवीस सरकारच्या कारकिर्दीत १५ हजारांवर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांना शॅडो मुख्यमंत्री म्हटले जायचे. या आत्महत्या का झाल्या याचे उत्तर पहिले पाटील यांनी द्यावे, असे प्रत्युत्तर आमदार व शिवसेना प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेतीतील काही कळत नाही, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केले होते. या विधानाला उत्तर देत मनीषा कायंदे यांनी सदर प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर, महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा परिणाम मार्चपासून दिसणार आहे. या योजनेच्या जीआरमध्ये त्याचे संपूर्ण शेड्यूल दिले आहे. हा जीआर नीट वाचला तर सर्व सामान्यांना कळतो. मग भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना का कळत नाही, असा सवाल कायंदे यांनी केला.
हेही वाचा- कोरोना व्हायरसचा धसका; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नगरसेवकांचे सर्व अभ्यास दौरे रद्द!