ETV Bharat / state

कोणाच्या गळ्यात पडणार भाजप प्रदेशाध्यक्षपदाची माळ? इच्छुकांच्या हालचालींना वेग

डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपद निवडले जाणार आहे. राज्यात मोठा पक्ष असूनही भाजपला सत्ता स्थापन न करता आल्यामुळे भाजप आता पक्ष संघटनेकडे लक्ष देत असून, राज्यात कार्यकर्त्यांची पसंती असलेला प्रदेशाध्यक्ष असावा, अशी मागणी भाजपचे काही नेते करताना दिसत आहे.

Who will be the BJP new state president?
कोणाच्या गळ्यात पडणार भाजप प्रदेशाध्यक्षपदाची माळ?
author img

By

Published : Dec 8, 2019, 12:01 PM IST

मुंबई - भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रदेशाध्यक्ष मिळावे यासाठी इच्छुकांनी हालचालींना सुरुवात केली आहे. इच्छुकांमध्ये विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री पंकजा मुंडे, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची नावे चर्चेत आहेत. याचबरोबर विनोद तावडे, चंद्रकांत बावनकुळे हेही इच्छुक असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे.

डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपद निवडले जाणार आहे. राज्यात मोठा पक्ष असूनही भाजपला सत्ता स्थापन न करता आल्यामुळे भाजप आता पक्ष संघटनेकडे लक्ष देत असून, राज्यात कार्यकर्त्यांची पसंती असलेला प्रदेशाध्यक्ष असावा, अशी मागणी भाजपचे काही नेते करताना दिसत आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधीक १०५ जागा मिळूनही विरोधी पक्षात बसावे लागले. मुख्यमंत्री पदावरुन सेना आणि भाजपमध्ये मतभेद निर्माण झाल्याने शिवसेनेने भाजपपासून फारकत घेतली. सेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. अशात आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे. तर भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी चुरस निर्माण झाली आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, माजी मंत्री पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा भाजमधीलच काही लोकांनी पराभव केल्याची टीका मुंडे समर्थकांनी केली होती. तसेच १२ डिसेंबरला गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपनाथ गड येथे आपण पुढे काय करायचे? पुढची आपली वाटचाल कशी असेल? याबाबत चर्चा करणार असल्याचे मुंडेंनी जाहीर केले होते. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. तसेच पंकजा मुंडे या भाजपला रामराम करत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्याही जोरदार चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र, आपण पक्ष सोडणर नसल्याची भूमिका मुंडेंनी घेतली आहे.

Intro:Body:

कोणाच्या गळ्यात पडणार भाजप प्रदेशाध्यक्षपदाची माळ? इच्छुकांच्या हालचालींना वेग

मुंबई -  भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रदेशाध्यक्ष मिळावे यासाठी इच्छुकांनी हालचालींना सुरुवात केली आहे. इच्छुकांमध्ये विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची नावे चर्चेत आहेत. याचबरोबर विनोद तावडे, चंद्रकांत बावनकुळे हेही इच्छुक असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे.

डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपद निवडले जाणार आहे. राज्यात मोठा पक्ष असूनही भाजपला सत्ता स्थापन न करता आल्यामुळे भाजप आता पक्ष संघटनेकडे लक्ष देत असून, राज्यात कार्यकर्त्यांची पसंती असलेला प्रदेशाध्यक्ष असावा अशी मागणी भाजपचे काही नेते करताना दिसत आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधीक १०५ जागा मिळूनही विरोधी पक्षात बसावे लागले. मुख्यमंत्री पादावरुन सेना आणि भाजपमध्ये मतभेद निर्माण झाल्याने शिवसेनेने भाजपपासून फारकत घेतली. सेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. अशात आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे. तर भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी चुरस निर्माण झाली आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, माजी मंत्री पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा भाजमधीलच काही लोकांनी पराभव केल्याची टीका मुंडे समर्थकांनी केली होती.  तसेच १२ डिसेंबरला गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपनाथ गड येथे आपण पुढे काय करायचे? पुढची आपली वाटचाल कशी असेल? याबाबत चर्चा करणार असल्याचे मुंडेंनी जाहीर केले होते. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. तसेच पंकजा मुंडे या भाजपला रामराम करत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्याही जोरदार चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र, आपण पक्ष सोडणर नसल्याची भूमिका मुंडेंनी घेतली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.