ETV Bharat / state

WHO Steps Survey : मुंबईकरांनो 'या' सर्व्हेची दखल घ्या, अन्यथा भोगावे लागणार गंभीर परिणाम - health problems have increased

तंबाखू आणि दारूचे वाढते व्यसन, दैनंदिन आहारात फळे आणि भाज्यांचा अभाव, आहारात मिठाचा अतिरेक, चुकीची जीवनशैली आणि शारीरिक व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या बाबी मुंबईकरांमध्ये आढळून आलेल्या आहेत. महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीने मुंबईमध्ये केलेल्या WHO STEPS SURVEY सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

WHO STEPS SURVEY
WHO STEPS SURVEY
author img

By

Published : Feb 24, 2023, 9:35 PM IST

मुंबई : अपुऱ्या फळ आणि भाज्या खाणे, रोजच्या जेवणामध्ये मिठाचा अधिक वापर, व्यायाम न करणे, सरासरीपेक्षा वजन अधिक असणे, तंबाखूचा अधिक वापर, उच्च रक्तदाब, साखरेचे प्रमाण अधिक, कोलेस्ट्रॉल आदी बाबी मुंबईकरांमध्ये आढळून आलेल्या आहेत. महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जागतिक आरोग्य संघटनेच्या सहाय्याने WHO STEPS SURVEY झोपडपट्ट्यां आणि चाळींमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

भारतात ६१ टक्के मृत्यू : तंबाखूचे वाढते प्रमाण, दारूचे व्यसन, रोजच्या आहारात फळ आणि भाज्यांचा अभाव, आहारात मिठाचा अतिवापर, चुकीची जीवनशैली आणि शारीरिक कसरतींचा अभाव यामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारख्या आजारांचे प्रमाण जगभरात वाढत आहे. असंसर्गजन्य रोग आजारात अंतर्भूत हृदयरोग, कर्करोग, मधुमेह व तीव्र श्वसनाचे विकार हे प्रामुख्याने मृत्यूचे कारण आहे. असंसर्गजन्य रोगामुळे २०१६ मध्ये जगात ४० दक्षलक्ष नोंदणीकृत मृत्यू आहे, हे प्रमाण जागतिक मृत्यूच्या एकूण ७१ टक्के असून भारतामध्ये हे प्रमाण एकूण मृत्यूंच्या ६१ टक्के इतके आहे.

तीन टप्प्यात सर्व्हेक्षण : मुंबई शहरात ऑगस्ट ते डिसेंबर २०२१ या कालावधीत तीन टप्प्यांत राबविण्यात आले. यात प्रथम टप्प्यात सामाजिक-जनसांख्यिकीय आणि वर्तणूक संबंधित माहितीसाठी डेटा संकलन करण्यात आला. दुसऱया टप्प्यात उंची, वजन आणि रक्तदाब यांचा डेटा संकलन करण्यात आला. तसेच तिसऱया टप्प्यात रक्तातील ग्लुकोज आणि कोलेस्टेरॉल पातळीचे मूल्यांकन करण्यासाठी बायोकेमिकल मोजमाप करण्यात आले. सर्वेक्षण करण्यासाठी एकूण ५ हजार ९५० प्रौढांशी संपर्क साधण्यात आला, यापैकी ५ हजार १९९ प्रौढांनी सर्वेक्षणात भाग घेतला. यात २ हजार ६०१ पुरुष आणि २ हजार ५९८ महिलांचा सहभाग नोंदवण्यात आला आहे.

सर्वेक्षणाचे प्रमुख निष्कर्ष -

अपुरी फळे भाज्या खाणे : जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसनुसार, दररोज किमान ४०० ग्रॅम, फळे आणि भाज्यांचे सेवन केल्याने असंसर्गजन्य रोगाचा धोका कमी होतो. मुंबईतसुमारे ९४ टक्के नागरिक दररोज अपुरी फळे भाज्या खात असल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे, जे शिफरस केलेल्या प्रमाणापेक्षा ५० टक्क्यांनी कमी आहे.

मिठाचा अधिक वापर : जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशीनुसार दैनंदिन जीवनात मीठ सेवन करण्याचे प्रमाण ५ ग्रॅम असावे असे नमूद करण्यात आले आहे. परंतु, सर्वेक्षणात सरासरी दैनंदिन मिठाचे सेवन ८.६ ग्रॅम इतके असल्याचे आढळून आले आहे. जे खूप जास्त आहे.

शारीरिक व्यायामाकडे दुर्लक्ष : जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केल्याप्रमाणे दर आठवड्याला १५० मिनिटांचा व्यायाम करणे आवश्यक आहे. सर्वेक्षणात जवळजवळ तीन-चतुर्थांश (७४.३ टक्के) म्हणजेच १० पैकी ७ मुंबईकर त्यांच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये योग, सायकलिंग, धावणे, चालणे, पोहणे, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, क्रिकेट, फुटबॉल यांसारखे फिटनेस क्रीडा संबंधित शारीरिक हालचाली करत नाहीत असे आढळले आहे.

सरासरीपेक्षा वजन अधिक : मुंबई जागतिक आरोग्य संघटना स्टेप्स सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की सुमारे ४६ टक्के नागरिकांचे वजन हे सरासरीपेक्षा अधिक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या वर्गीकरणानुसार १२ टक्के मुंबईकर लठ्ठ असल्याचे आढळले आहे. लठ्ठपणा महिलांमध्ये जास्त आढळला आहे. पुरुषांमध्ये उंची पेक्षा २५ टक्के तर महिलांमध्ये उंचीपेक्षा ३० टक्के लठ्ठपणा आढळून आला आहे.

तंबाखूचा अधिक वापर : जागतिक आरोग्य संघटनेनुसार तंबाखूमुळे दरवर्षी ८ दशलक्षाहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. त्यापैकी ७ दशलक्षाहून अधिक मृत्यू थेट तंबाखूच्या सेवनामुळे होतात. सर्वेक्षणानुसार एकूण तंबाखूच्या वापराचे प्रमाण १५ टक्के आहे. त्यापेकी १२ टक्के नागरिक दररोज तंबाखूचे सेवन करतात. हे प्रमाण पुरुषांमध्ये अधिक आहे. मौखिक तंबाखूच्या म्हणजेच मशेरी, गुटखा, पान मसाला, खैनी वापराचे प्रमाण सुमारे ११ टक्के इतके आहे, जे खूप जास्त आहे.

नागरिकांना रक्तदाबाचा आजार : मुंबईत ३४ टक्के नागरिकांमध्ये रक्तदाब वाढल्याचे नोंदवले आहे, त्यापैकी ७२ टक्के नागरिक हे सार्वजनिक आणि खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे आढळले आहे. जे उपचार घेत होते, त्यापैकी फक्त ४० टक्के नागरिकांचा रक्तदाब नियंत्रणात असल्याचा आढळून आला.

रक्तातील साखर किंवा मधुमेह : मधुमेहाच्या रूग्णांमध्ये, टाइप २ हा जास्त प्रमाणात आहे. मुंबईत साधारणत १८ टक्के मुंबईकरांचे उपाशीपोटी रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्य प्रमाण पेक्षा अधिक आहे. प्री-डायबेटिसची टक्केवारी १५.६ टक्के आहे. अशा व्यक्तींनी प्रतिबंधात्मक उपाय केले नाहीत तर अशा व्यक्तिंना पुढे जाऊन मधुमेह होऊ शकतो. ८२ टक्के व्यक्ती हे सार्वजनिक आणि खाजगी आरोग्य सुविधांमध्ये रक्तातील वाढलेल्या साखरेसाठी उपचार घेत होते. जे उपचार घेत होते त्यापैकी फक्त ४२ टक्के व्यक्तिंना त्यांच्या रक्तातील साखर नियंत्रणात असल्याचे आढळून आले. ८.३ टक्के व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेह या दोन्ही आजार आढळले.

कोलेस्टेरॉल वाढलेले : या सर्वेक्षणात, सुमारे २१ टक्के व्यक्तिंना म्हणजेच ५ पैकी १ व्यक्तीमध्ये एकूण कोलेस्ट्रॉल (१९० mg/dl) वाढलेले आढळले किंवा सध्या वाढलेल्या कोलेस्ट्रॉलसाठी औषधोपचार घेत आहेत.

हृदय रोगाची भीती : १८ ते ६९ वर्षे वयोगटातील सुमारे ३७ टक्के सर्वेक्षण व्यक्तींमध्ये मध्ये म्हणजेच जवळपास १० पैकी ४ मुंबईकर दैनिक धुम्रपान करणारे, प्रमाणापेक्षा कमी फळे आणि भाज्या खाणे, अपुरा शारीरिक व्यायाम, लठ्ठपणा, रक्तदाब, रक्तातील साखर यापैकी तीन पेक्षा अधिक आजार झाले आहेत. यामुळे या नागरिकांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचे आजार होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

हेही वाचा -Sambhajinagar And Dharashiv Rename : औरंगाबाद झाले ‘छत्रपती संभाजीनगर’ तर उस्मानाबाद झाले 'धाराशिव'; केंद्राची परवानगी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.