मुंबई : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Thackeray group MLA Aaditya Thackeray) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात खरा मुख्यमंत्री कोण? (Who is the real Chief Minister) असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारला. दरम्यान, मुंबई-नाशिक आणि मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai Nashik and Mumbai Goa highway) खड्डय़ांवरूनही त्यांनी सरकारवर टीका केली.
मुंबई-गोवा रस्त्यावर खड्डे : मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले, "गेल्या दोन आठवड्यांपासून मी मुंबई-नाशिक महामार्गाचा मुद्दा सातत्याने मांडत आहे. सध्या काही मंत्री 'वंदे भारत एक्स्प्रेस'ने (Vande Bharat Express) प्रवास करत आहेत. मुंबई-गोवा रस्त्याचे कामही अनेक वर्षांपासून सुरू आहे. या रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. या मुद्द्यावर अनेक नागरिक विरोध करत आहेत. हा मुद्दा संसदेतही उचलून धरला जात आहे. मात्र, सरकार पालकमंत्री कोण होणार? यावरच अडून बसले आहे," असा टोला आदित्य ठाकरेंनी महायुती सरकारला लगावला आहे.
मंत्र्यांचा 'वंदे भारत एक्स्प्रेस'ने प्रवास : मुंबई-गोवा महामार्ग भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (National Highways Authority of India) म्हणजेच केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे हा महामार्ग महाराष्ट्रातून जात असल्याने एवढे खड्डे पडले का? असा सवाल त्यांनी भाजपा सरकारला केला आहे. या रस्त्यांची दुरुस्ती होत का नाही? असा प्रश्न पडतो. NHAI हजारो किलोमीटरचे रस्ते एका तासात पूर्ण करते असे आपण ऐकतो. उद्या ते इथून चंद्रापर्यंत रस्ते बनवतील. पण आज महाराष्ट्रातील रस्त्याबाबत कोणी बोलत नाही. प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. मुंबई-नाशिक रस्ता खराब झाल्यामुळेच संबंधित मंत्री 'वंदे भारत एक्स्प्रेस'ने प्रवास करत आहेत, असा टोला त्यांनी राज्यातील मंत्र्यांना लगावला आहे.
खरे मुख्यमंत्री कोण? : तपासात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल 140 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 2023 सालासाठी केंद्रीय पदकाने गौरविण्यात येणार आहे. यावरुन आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. एकही केंद्रीय गृह खात्याचे पदक यावर्षी महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात पद्म पुरस्कारासाठी अनेक शिफारशी केंद्राकडे पाठवण्यात आल्या होत्या. मात्र राज्याचा वाटा किती, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. या तिघांपैकी राज्य सरकारचे खरे मुख्यमंत्री कोण? असा थेट सवाल आदित्य ठाकरेंनी शिंदे- फडणवीस- पवार सरकारला केला आहे.
देशातील 140 पोलीस अधिकाऱ्यांचा गौरव : प्रत्येक वर्षी केंद्रीय गृह खाते हे विशेष पदकाने तपास कार्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव करत असते. 12 ऑगस्ट रोजी पुरस्काराची घोषणा होत असते. यावर्षी देशातील 140 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. विशेष म्हणजे पुरस्काराच्या यादीत महाराष्ट्रातील एकाही पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्याच्या नावाचा समावेश नसल्याने आदित्य ठाकरे यांनी सरकारवर तोफ डागली आहे.
हेही वाचा -
- Maharashtra Politics : ठाकरे गटाचे दोन खासदार, आठ आमदार लवकरच शिवसेनेत; 'या' खासदाराचा गौप्यस्फोट
- Devendra Fadnavis : टीव्हीवर बोलणाऱ्यांचे मानसिक आरोग्य तपासून उपचार करा; फडणवीसांचा राऊतांना नाव न घेता टोला
- Sharad Pawar Ajit Pawar Secret Meeting : काका-पुतण्यांची गुप्त बैठक; शरद पवारांनी स्पष्टच सांगितले...