ETV Bharat / state

कोण आहेत नवाब मलिक..?, जाणून घ्या त्यांचा व्यवसायिक ते राजकारणापर्यंतचा प्रवास - नवाब मलिक मराठी माहिती

नवाब मलिक हे महाराष्ट्र सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून कार्यरत आहेत. मात्र, एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे मलिक सध्या बहुचर्चित आहेत.

Nawab Malik
नवाब मलिक
author img

By

Published : Nov 10, 2021, 7:27 PM IST

Updated : Nov 10, 2021, 7:35 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) सध्या जोरदार चर्चेत आहेत. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केलेल्या अनेक आरोपांमुळे नवाब मलिक चर्चेत आहेत. मात्र, नवाब मलिक कोण आहेत हे जाणून घेऊ घेऊया...

नबाब मलिकांची राजकीय ओळख

नवाब मलिक यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला समाजवादी पक्षातून सुरुवात केली. मात्र, नंतर ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सामील झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मुस्लिम चेहरा म्हणून नवाब मलिक यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातून त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये त्यांनी अल्पसंख्यांक मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला आहे.

नवाब यांची पार्श्वभूमी..?

नवाब मलिक यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील रुसवा या गावात 20 जून, 1959 रोजी झाला. मलिक यांचे कुटुंब 1970 मध्ये उत्तर प्रदेशातून मुंबईला स्थलांतरित झाले. मुंबईतील अंजुमन हायस्कूलमधून त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले तर बुऱ्हानी महाविद्यालयातून बारावी पर्यंतचे शिक्षण घेतले. पदवीधर होण्यासाठी त्यांनी याच महाविद्यालयात शिक्षण सुरू ठेवले.

नवाब मलिक यांची राजकीय वाटचाल

सुरुवातीला त्यांनी एक व्यावसायिक म्हणून त्यांनी कारकीर्दीला म्हणून सुरुवात केली. मात्र, त्यानंतर राजकारणाकडे त्यांचा ओढा वाढला आणि त्यांनी राजकारणात उडी घेतली. नव्वदच्या दशकात सुरू असलेल्या राम मंदिर आंदोलनाच्या विरोधात समाजवादी पार्टीच्या माध्यमातून त्यांनी सहभाग नोंदवला. 1996 मध्ये कुर्ला-नेहरूनगर भागातून नवाब मलिक यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक समाजवादी पार्टीच्या तिकिटावर लढवली आणि विजय मिळवला. 1999 मध्ये पुन्हा त्यांनी समाजवादी पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. 2004 साली केंद्रात युपीए सरकार आल्यानंतर त्यांनी समाजवादी पार्टीला रामराम ठोकत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2009 मध्ये पुन्हा एकदा ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अनुशक्ती नगर विधानसभा मतदार संघातून निवडून आले. दरम्यान, त्यांना गृहनिर्माण राज्यमंत्री आणि त्यानंतर कामगार मंत्री म्हणून कार्यभार सोपवण्यात आला होता. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा त्यांनी विजय मिळवला आणि त्यांना अल्पसंख्यांक मंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली.

जावयाच्या अटकेनंतर आक्रमक झाले नवाब मलिक

नवाब मलिक यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी मेहजबीन, मुले मराज, आमिर आणि मुली निलोफर आणि सना यांचा समावेश आहे. नवाब मलिक यांच्या जावयाचे नाव समीर खान आहे. समीर खान यास ड्रग्स पेडलरशी संबंध असल्याचे सांगत अटक करण्यात आली आणि तुरुंगात पाठवण्यात आले. या घटनेवरून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यात वैरत्व निर्माण झाले. त्यानंतर समीर वानखेडे यांनी आर्यन खान याला केलेली अटक कशी चुकीची आहे, तसेच समीर वानखेडे हे खोट्या जात प्रमाणपत्रावर कसे नोकरीला लागले आहेत, असे अनेक आरोप करत नवाब मलिक दररोज चर्चेत आले. त्यानंतर अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांचे ड्रग पेडलरशी काय संबंध आहेत, असा सवाल केल्याने या आरोप-प्रत्यारोपांमध्ये विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही उडी घेतली, त्यानंतर दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या.

हे ही वाचा - Big News : नवाब मलिकांचा नवा बॉम्ब : देवेंद्र फडणवीस अंडरवर्ल्डच्या गुंडाकडून वसुली करत होते

Last Updated : Nov 10, 2021, 7:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.