ETV Bharat / state

Kedar Dighe Tweaks : निष्ठावंत कोण? केदार दिघेंचा मुख्यमंत्री शिंदे यांना चिमटा

author img

By

Published : Jul 2, 2022, 7:54 PM IST

पक्षादेश मानून मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेल्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले. तर काहींनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पक्षादेश धुडकावले. नक्की निष्ठावंत कोण? (Who is loyal) असा चिमटा आनंद दिघे यांचे पुतण्या केदार दिघे यांनी (Kedar Dighe tweaks Chief Minister Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांना काढला आहे. शिवसेनेतील बंडखोरीमुळे शिंदे गट टीकेचा धनी बनला आहे.

Kedar Dighe
केदार दिघें

मुंबई: राज्यात नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री केले. केंद्रीय पक्ष नेतृत्वाचे आदेशाचा प्रदेश भाजपच्या सर्वच नेत्यांना धक्का बसला आहे. राजकीय वर्तुळातही फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्री पदाची चर्चा आहे. फडणवीस हे भाजपचे खंदे कार्यकर्ते आहेत. नेहमीच ते आदेशाचे पालन करतात. आताही केंद्रीय आदेशाचे पालन करून यांनी पक्षनिष्ठा दाखवून दिली. धर्मवीर आनंद दिघे यांचा पुतण्या केदार दिघे यांनी हा धागा पकडून शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. यावेळी पक्षादेश पाळणारा की पक्षादेशा धुडकवणारा निष्ठावंत असा खोचक सवाल उपस्थित केला आहे. केदार दिघे यांची पोस्ट जोरदार व्हायरल झाली आहे.

पक्षादेश आणि निष्ठा असे म्हणत केदार दिघे यांनी मुख्यमंत्री पदाचे दावेदार फडणवीस यांनी पक्षादेश मानून उपमुख्यमंत्री पद स्वीकारले. तर दुसरीकडे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप पासून शिवसेना वाचवण्यासाठी घेतलेल्या निर्णयाविरोधात काही जण पक्षादेश डावलून गेले. त्यामुळे नक्की निष्ठावंत कोण? असा सवाल केदार दिघे यांनी उपस्थित केला आहे. शिवसेना - भाजप युतीच्या सत्ता काळात भाजपने मोठी शिवसेनेची फरफट केली. आमदारांच्या वाढत्या तक्रारींमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपशी फारकत घेतली.

तत्कालीन गटनेते आणि आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकाऱ्यांवरील अन्याय सहन करणार नाही, असे सांगत ठाण्यातील जाहीर सभेत गटनेते पदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन युतीत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, अडीच- अडीच वर्षाचा मुख्यमंत्री असा करार झाल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला दूर लोटत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या सोबत पहाटेचा शपथविधी उरकला.

भाजपला धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यात आले. हे महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षे चालले. शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे दोन गट पडले. शिंदे यांच्या गटात चाळीसहून अधिक आमदार सामील आहेत. तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केवळ १६ आमदार आहेत. बंड पुकारण्यापेक्षा समोर येऊन मत स्पष्ट करा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी वारंवार केले. मात्र, अडेलतट्टूची भूमिका बंडखोर आमदारांनी घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. तर दुसरीकडे भाजपने एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत, मुख्यमंत्री बनवले आहे. या सर्व प्रकारावर दिघे यांचे अतिशय ट्विट बोलके असल्याची चर्चा आहे.

बंडखोरी केलेल्या आमदारांना पक्षादेश बजावला होता. बंडखोरांनी त्याला केराची टोपली दाखवली. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत, एकनाथ शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी केली. यासंबंधीचे पत्र नुकतेच जारी केले आहे. तुम्ही पक्षविरोधी कारवाया करत आहेत, तुम्ही स्वेच्छेने शिवसेनेचे सदस्यत्व सोडले आहे, त्यामुळे तुमच्यावर ही कारवाई करण्यात येत असल्याचे या पत्रात म्हटले आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची नावे घेतली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा दिल्या. तर दुसऱ्या दिवशी त्यांची पक्षातून निलंबित केले आहे. इतर बंडखोर आमदार ही उद्धव ठाकरे यांच्या निशाण्यावर आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.