मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसने, काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसचे तीन दिवसीय चिंतन शिबिर पार पडले. यात सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह काँग्रेसचे सर्वच ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी नाना पटोले यांनी भंडारा गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाशी हातमिळवणी करत काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला. तसेच भिवंडी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते फोडले अशी तक्रार केली. त्यामुळे महाविकास आघाडी मध्ये सर्वच अलबेल आहे अशी परिस्थिती नाही.
नाना पटोले यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर राष्ट्रवादीची वरिष्ठांकडे केलेली तक्रार गंभीर आहे. याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किंवा महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील याबाबत शरद पवार यांच्याशी नक्कीच चर्चा करतील. मात्र या कारणामुळे लगेचच महा विकास आघाडी तुटण्याची शक्यता नाही. या आधीही आघाडी सरकार मध्ये असताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील मतभेद उफाळून आले होते. राज्यात काँग्रेसचे मुख्यमंत्री असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस कडून नेहमीच काँग्रेसची गळचेपी होत असल्याचे आरोप झाले होते. मात्र तरीही या दोन्ही पक्षांनी राज्यांत दहा वर्ष सरकार चालवले. त्यामुळे आता खुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी असा आरोप केल्यानंतरही थेट आघाडीवर त्याचा परिणाम होईल असं वाटत नसल्याचे मत राजकीय विश्लेषक प्रवीण पुरी यांनी व्यक्त केले आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडी मध्ये एकत्रितपणे काम करत आहेत. असे असताना काही प्रश्न उद्भवले तर याचा अर्थ महाविकास आघाडी मध्ये काही अलबेल नाही असा होत नाही. महाविकास आघाडीमध्ये काहीही गडबड नाही. तिन्ही पक्ष भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काम करत आहेत. नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तक्रार दिल्ली हाय कामांकडे केली असेल तर, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बसून चर्चा करतील. या प्रश्नांवर समाधान काढतील. मात्र अनेक वेळा स्थानिक पातळीवर निर्णय घेताना तेथील परिस्थितीचा विचार करून निर्णय घेतले जातात. त्यामुळे नाना पटोले यांनी आपला शत्रू कोण? हे ओळखावे असे स्पस्टीकरण राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी दिले आहे.
हेही वाचा : Maharashtra State Elections : हवामान विभागाशी चर्चा करून निवडणुका घेणार, राज्य निवडणूक आयोगाची माहिती