ETV Bharat / state

Har Ghar Tiranga : काय आहे हर घर तिरंगा अभियान आणि ते का राबवले जात आहे - कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी

आझादीच्या अमृत महोत्सवांतर्गत (Amrit Mahotsav of Azadi) संपुर्ण देशातील लोकसहभागातून घरोघरी (Har Ghar Tiranga ) भारतीय तिरंगा ध्वज ( National flag india) फडकवण्यात येणार आहे (Har Ghar Tiranga Abhiyan) . ज्यात सर्व सरकारी आणि खाजगी आस्थापनांचा समावेश असेल. यासोबतच सर्व नागरिकांना त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिरंगा दाखवण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. पाहुया काय आहे हर घर तिरंगा अभियान (What is Har Ghar Tiranga Abhiyan) आणि ते का राबवले जात आहे ( why is it being implemented).

Har Ghar Tiranga
हर घर तिरंगा
author img

By

Published : Aug 1, 2022, 7:59 PM IST

मुंबई: हर घर तिरंगा अभियानांतर्गत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभुमीवर देशभरातील २० कोटींहून अधिक घरांवर तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना देशाच्या प्रत्येक नागरिकाने घरी तिरंगा लावण्यासाठी आणि तो फडकवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा मोहीम सुरू केली आहे. लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे आणि देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आझादीचा अमृत महोत्सव लोकसहभागाच्या भावनेने साजरा करणे हा या मोहिमेमागील संकल्पना असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले आहे. या मोहिमेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) यांनी 22 जुलै रोजी ट्विट केले होते.

हर घर तिरंगा अभियान: जगभरातील अधिकाधिक भारतीयांना त्यांच्या घरी तिरंगा फडकवण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हर घर तिरंगा मोहीम सुरू करण्यात आली आहे. या वर्षी स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना राष्ट्र उभारणीसाठी प्रत्येक नागरिकाच्या समर्पणाचे आणि राष्ट्रध्वजाशी संबंधित वैयक्तिक संलग्नतेचे प्रतीक म्हणून हे अभियान कार्य करणार आहे. हर घर तिरंगा अभियानांतर्गत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येक घरात तिरंगा ध्वज फडकवला जाईल. या मोहिमेसाठी प्रत्येक नागरिकाला प्रोत्साहन दिले जाईल. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत हे महत्त्वाचे अभियान आहे.

मोहिमेचा उद्देश काय? : नागरिकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे आणि राष्ट्रध्वजाची जाणीव वाढवणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. भारतामध्ये राष्ट्रीय ध्वज संहिता काय आहे. त्याच्या वापराचे नियम काय आहेत. यासाठी भारत सरकारने 'फ्लॅग कोड ऑफ इंडिया 2002' तयार केला आहे. यात राष्ट्रध्वजाचा वापर, प्रदर्शन आणि फडकवण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली आहेत. 26 जानेवारी 2002 रोजी भारतीय ध्वज संहिता लागू झाली. ज्या द्वारे खाजगी सार्वजनिक आणि सरकारी संस्थांद्वारे ध्वज फडकवण्याची नियमावली स्पष्ट करते.

वेबसाइट सुरू: केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने हर घर तिरंगा योजनेसाठी लोकांना अधिक उत्साही आणि जागरूक करण्यासाठी एक वेबसाइट सुरू केली आहे. ज्यामध्ये देशाचा कोणताही नागरिक झेंडा लावू शकतो आणि आपली देशभक्ती दाखवण्यासाठी तिरंगा ध्वजासह सेल्फी काढू शकतो आणि या वेबसाइटवर पोस्ट करू शकतो. यंदाच्या स्वातंत्र्यदिनाला ७५ वर्षे पूर्ण होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा उपक्रम सुरू केला आहे. भारताच्या स्वातंत्र्याची 75 गौरवशाली वर्षे साजरी करण्यासाठी हा उत्सव सुरू करण्यात आला आहे. ज्यामध्ये 28 राज्ये, 8 केंद्रशासित प्रदेश आणि देशातील 150 हून अधिक देशांमध्ये या अमृत महोत्सवाअंतर्गत 50,000 हून अधिक कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केले आहेत. जे आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कार्यक्रमांपैकी एक आहे.

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे की 'हर घर तिरंगा अभियाना'शी संबंधित उपक्रमांसाठी कंपन्या त्यांचा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधी खर्च करू शकतात. मंत्रालयाने एका परिपत्रकात म्हटले आहे की या मोहिमेशी संबंधित राष्ट्रध्वजाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि पुरवठा, पोहोच आणि इतर संबंधित कामासाठी सीएसआर निधी खर्च करणे हे कंपनी कायद्याच्या अनुसूची VII अंतर्गत पात्र आहेत. संस्कृतीशी संबंधित शिक्षणाला चालना देण्यासाठी. परिपत्रकात असेही म्हटले आहे की कंपन्या कंपनी (CSR ) धोरण नियम, 2014 आणि संबंधित परिपत्रके किंवा मंत्रालयाने जारी केलेल्या स्पष्टीकरणांनुसार ही कामे करू शकतात.

मोहिमेवर किती खर्च : ध्वज बनवणाऱ्या कंपन्या सुरुवातीला केंद्र आणि राज्य सरकारला कर्जावर ध्वज पुरवतील. त्या देशातील सर्व नागरिकांना स्वतःच्या पैशाने ध्वज विकत घ्यावा लागेल. जे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी ध्वजारोहण करणार आहेत. 1 ऑगस्टपासून पोस्ट ऑफिसमध्येही ध्वज उपलब्ध केले आहेत. केंद्र सरकारच्या 20 कोटी घरांवर ध्वज फडकवण्याचे उद्दिष्ट आहे, जर राष्ट्रध्वजाची किमान किंमत देखील 10 रुपये असेल. त्यामुळे या मोहिमेसाठी एकूण 200 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून हे 200 कोटी त्याच लोकांच्या खिशातून येणार आहेत.

हेही वाचा : Har Ghar Tiranga : भारतीय तटरक्षक दलाने समुद्रावर फडकवला तिरंगा; व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल सलाम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.