ETV Bharat / state

Law About Cloth Wearing In India : भारतात नागरिकांनी कोणते कपडे घालावेत याबद्दल कायदा काय सांगतो? - बिग बॉस फेम उर्फी जावेद

स्प्लिट्सव्हिला १४ आणि बिग बॉस ओटीटीमधून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री उर्फी जावेद (Bigg Boss fame Urfi Javed) सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे. उर्फीच्या अंतरंगी आणि बोल्ड फॅशनला सध्या राज्यात राजकीय रंग चढलेला असताना तिच्या एका नवीन भगव्या वस्त्रातील रीलने लक्ष वेधून घेतले आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच भाजपा मुंबई महिला अध्यक्ष चित्रा वाघ (BJP Leader Chitra Wagh) यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक पणसाळकर यांना अर्ज देऊन उर्फीला आवर घालण्याची विनंती केली आहे. पण भारतात कोणी कसे कपडे परिधान करावे, याबद्दल काही नियम (Law About Cloth Wearing In India) आहेत का? मुंबई पोलीस उर्फीवर कोणत्या कलमांच्या आधारे कारवाई (Police action on Urfi Javed) करू शकते? आणि ती कारवाई झाल्यास शिक्षेची तरतूद काय? यासंदर्भात वकील विनोद सांगवीकर यांच्याशी चर्चा केली. (Dress code for visiting temples)

Law About Cloth Wearing In India
अभिनेत्री उर्फी जावेद
author img

By

Published : Jan 6, 2023, 7:09 PM IST

वकील विनोद सांगवीकर कपडे घालण्याच्या नियमांविषयी माहिती देताना

मुंबई : भारतात महिला व पुरुषांच्या कपड्यांबद्दल कोणते नियम आहेत यावर वकील विनोद सांगवीकर यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, “भारतात सार्वजनिक ठिकाणी महिला व पुरुषांनी कसे कपडे घालावे, याबद्दल कोणतीच नियमावली नाही. (Bigg Boss fame Urfi Javed) भारतीय संविधानातील आर्टिकल 15 आणि 21 नुसार स्त्रिया आणि पुरुष, भारतीय नागरिक कोणतेही वस्त्र परिधान करू शकतात. (BJP Leader Chitra Wagh) आपण हवे तसे कपडे परिधान करू शकतो. पण काही धार्मिक ठिकाणं, शाळा किंवा एखाद्या संस्थेचे काही नियम असतील, ड्रेस कोड असेल तर तसे कपडे परिधान करावे (Law About Cloth Wearing In India) लागतात. बऱ्याच ठिकाणी मंदिरांमध्ये जाण्यासाठी ड्रेस कोड (Dress code for visiting temples) असतो, तो तिथल्या मंदिर प्रशासनाने ठरवलेला असतो. आपण त्या मंदिराचं, धार्मिक स्थळाचं पावित्र्य जपलं जावं, म्हणून त्या नियमांचं पालन करतो. मात्र, इतर ठिकाणी मा तुम्ही कोणते कपडे परिधान करावे, यावर कोणतीही निर्बंध नाही. (Police action on Urfi Javed)

कायद्यादा आढावा : 292 अंतर्गत जो गुन्हा होतो तो कोणताही गुन्हा उर्फी जावेदने केलेला नाही. उर्फी जावेदने कुठला गुन्हा केला का असं जर विचारलं असेल तर तिच्या वस्त्रावरनं ती जाहिरात किंवा त्याचं प्रदर्शन ते विक्रीसाठी करत नाहीये, आपल्याकडे इंडियन पिनल कोड त्याशिवाय स्त्रियांचे असभ्य प्रतिरुपण प्रतिबंध कायदा 1986 आहे. त्यामध्ये जर एखादी स्त्री किंवा एखादी जाहिरात त्या ठिकाणी स्त्रियांचा असभ्य प्रदर्शन करत असेल तरच त्या कायद्यांतर्गत कारवाई करता येते. यामध्ये उर्फी जावेद ही कुठली अशी जाहिरात करत करत नाहीये, त्याच्यामुळे कायद्याने तरी उर्फी जावेदला कुठला गुन्हा केलाय असं म्हणता येणार नाही. मात्र स्त्रियांचे असभ्यपरिरूपण अधिनियम 1986 नुसार जाहिरातीं वारे किंवा प्रकाशनाला एक चित्रे आकृत्यांमधून किंवा अन्य कोणताही रीतीने स्त्रियांच्या असभ्य प्रतिरूपण करण्यास प्रतिबंध करणारा आणि त्यांच्याशी संबंधित किंवा अनुशांकित बाबींसाठी या अधिनियमानुसार कारवाई होते.

शिक्षेची तरतूद काय आहे? : अश्लीलतेवरून पहिल्यांदा कारवाई झाल्यास ३ वर्ष तुरुंगवास आणि १ हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. तसेच दुसऱ्यांदा या कलमेअंतर्गत दोषी आढळल्यास ७ वर्षांचा तुरुंगवास आणि ५ हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे, अशी माहिती वकील विनोद सांगवीकर यांनी दिली.

उर्फीवर कोणत्या कलमांच्या आधारे कारवाई होऊ शकते ? : याबद्दल बोलताना वकील विनोद सांगवीकर म्हणाले पोलीस उर्फीवर अश्लीलतेच्या आधारावर जाहिरात केल्याचे सिद्ध करून कारवाई करू शकतात. ही कारवाई भारतीय दंड संहितेच्या कलम २९२ अंतर्गत उर्फीवर होऊ शकते. तिच्याविरोधात तक्रार दिल्यानंतरच पोलीस या कलमेअंतर्गत कारवाई करू शकतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.