मुंबई - भारतीय रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या 150 गाड्यांचे खासगीकरण होणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या खासगीकरण धोरणाविरोधात पश्चिम रेल्वे मजदूर संघाने मुंबई सेंट्रल स्थानक परिसरात रॅली काढून निदर्शने केली.
हेही वाचा - १०० मार्गांवर रेल्वेचे खासगीकरण, नीती आयोगाचा प्रस्ताव
रेल्वेचे खासगीकरण झाल्यानंतर, रेल्वे कर्मचारी, चालक आदी सर्व पदे खासगी कंपनीच्या मतानुसार भरली जातील. खासगीकरणामुळे विद्यमान रेल्वे कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे, असे मत कर्मचारी व्यक्त करत आहेत. जे. जी. महूरकर यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी आपला आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय रेल्वे वाचावी आणि कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी पश्चिम रेल्वे मजदूर संघाने आंदोलन केले आहे.