मुंबई - मुंबईत 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर यांना लस देण्यात येत होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील जेष्ठ नागरिक आणि 45 वर्षावरील आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. आज मुंबईत विकेंड लॉकडाऊन असताना 21 हजार 94 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण 16 लाख 35 हजार 372 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. मुंबईत लसीचा तुटवडा असताना 88 हजार लसीचा साठा उपलब्ध झाल्याने लसीकरण ठप्प झाले नाही.
लसीकरणाची आकडेवारी -
मुंबईत आज 21 हजार 094 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यातील 17 हजार 740 लाभार्थ्यांना पहिला तर 3 हजार 354 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 16 लाख 35 हजार 372 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 14 लाख 49 हजार 710 लाभार्थ्यांना पहिला तर 1 लाख 85 हजार 662 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 57 हजार 675 आरोग्य कर्मचारी, 2 लाख 78 हजार 481 फ्रंटलाईन वर्कर, 6 लाख 58 हजार 373 जेष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 4 लाख 40 हजार 483 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
असे झाले लसीकरण -
मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर 18 हजार 690 तर आतापर्यंत 10 लाख 66 हजार 342 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.
केंद्र आणि राज्य सरकारच्या रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज 2 हजार 73 लाभार्थ्यांना तर एकूण 1 लाख 6 हजार 468 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज 331 लाभार्थ्यांना तर आतापर्यंत एकूण 4 लाख 62 हजार 562 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.
एकूण लसीकरण
आरोग्य कर्मचारी - 2,57,675
फ्रंटलाईन वर्कर - 2,78,481
जेष्ठ नागरिक - 6,58,373
45 ते 59 वय - 4,40,843
एकूण - 16,35,372