ETV Bharat / state

Wedding Shopping : लग्नासाठी शॉपिंग करायची असेल तर  या मार्केटमध्ये मिळतील बजेटमध्ये कपडे - wedding shopping in Delhi market

वधू, वरापासून ते सर्व नातेवाईक सर्वच लग्नासाठी उत्सूक असतात. लग्नात खूप तयारी करावी ( wedding shopping ) लागते. कपडे आणि दागिन्यांपासून ते खरेदीपर्यंत अनेक गोष्टी कराव्या लागतात. सेलिब्रिटींच्या लग्नाचे फोटो पाहून त्या स्वतःच्या लग्नाची स्वप्ने सजवतात.

Wedding Shopping
दिल्लीच्या मार्केटमध्ये बजेटमध्ये कपडे
author img

By

Published : Oct 31, 2022, 12:55 PM IST

मुंबई : कमी पैशात चांगला लेहेंगा किंवा साडी घेण्याची इच्छा सर्वांचीच असते. मात्र, त्यासाठी कुठे शॉपिंग करावी जेणेकरून ते कमी पैशात खरेदी करू शकतील. हा प्रश्न त्यांना सतावत असतो. आता तुम्हाला लग्नाच्या खरेदीबाबत गोंधळण्याची गरज नाही. दिल्लीत अशा अनेक बाजारपेठा आहेत, जिथे तुम्ही घाऊक दरात लग्नाची खरेदी करू ( wedding shopping in Delhi market ) शकता. लेटेस्ट फॅशनच्या कपड्यांपासून ते लग्नाच्या आवश्यक वस्तूंपर्यंत सर्व काही दिल्लीच्या बाजारपेठांमध्ये बजेटमध्ये ( clothes budget under control ) मिळेल.

चांदणी चौक : दिल्लीतला चांदणी चौक हा बाजार देशभर प्रसिद्ध ( Chandni Chowk ) आहे. तो दिल्लीच्या सर्वात जुन्या बाजारपेठांपैकी एक आहे. जिथे तुम्हाला वधूचे कपडे आणि दागिने स्वस्त दरात मिळतील. चांदणी चौकात अनेक जुने आणि विश्वासू ज्वेलर्सचे शोरूम आहेत. येथून लग्नाच्या दागिन्यांची खरेदी करू शकता. याशिवाय, नववधूच्या लेहेंगांपासून ते सुंदर साड्या, अनारकली आणि शरारा सूट इत्यादी नवीनतम आणि ट्रेंडी डिझाइन्स येथे सहज मिळू शकतात.

गांधी मार्केट : लग्नात विविध प्रकारचे खर्च होतात. त्यामुळे खिशाचा भार वाढतो. तथापि, कमी बजेटमध्ये चांगली वस्तू खरेदी करण्यासाठी दिल्लीचे गांधी मार्केट हा एक चांगला पर्याय (Gandhi Market ) आहे. गांधी मार्केट हे आशियातील सर्वात मोठे टेक्सटाईल हब म्हणून प्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला घाऊक किमतीत कपडे मिळतील. वधूच्या लेहेंग्यापासून ते वराच्या शेरवानी, सँडल आणि शूजपर्यंत सर्व काही तुम्ही कमी पैशात खरेदी करू शकता.

राजौरी गार्डन : जेव्हा लग्नाच्या खरेदीचा विचार केला जातो. तेव्हा दिल्लीच्या राजौरी गार्डन्सचा उल्लेख करावा ( Rajouri Garden ) लागतो. राजौरी गार्डनमध्ये महागडे डिझायनर लेहेंगा आणि साड्याही भाड्याने मिळतात. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही बजेटमध्ये तुमच्या आवडत्या अभिनेत्रीसारखा लेहेंगा भाड्याने घेऊ शकता. याशिवाय राजौरी गार्डनमध्ये कॉस्मेटिक स्टोअर्स, ज्वेलरी शॉप्स आणि कपड्यांच्या खरेदीसाठी चांगली आणि परवडणारी दुकाने आहेत.

करोल बाग : जर बजेट चांगले असेल आणि लग्नासाठी काही अनोख्या वस्तू खरेदी करायच्या असतील तर तुम्ही दिल्लीतील करोलबागलाही जाऊ ( Karol Bagh ) शकता. येथे तुम्हाला डिझायनर साड्या, लेहेंगा सहज मिळतील. करोलबागमध्ये अनेक ब्रँडची महागडी दुकानेही आहेत. येथे तुमच्या बजेटपेक्षा जास्त पैसे खर्च होऊ शकतो. परंतू तुम्हाला उत्कृष्ट दर्जाच्या डिझायनर वस्तू नक्कीच मिळतील. येथे अनेक पादत्राणे आणि दागिन्यांची दुकाने आहेत. लग्नाच्या खरेदीसाठी इथे इतरही अनेक दुकाने आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.