ETV Bharat / state

Wedding Season 2022 : सण उत्सवा पाठोपाठ लग्नकार्यही जोमात; लग्न मंडप, कॅटरर्स झाले हाऊसफुल्ल

तब्बल दोन वर्षांनी लग्नमंडप व कॅटरर्सची बुकिंग हाऊसफुल्ल (Booking of wedding halls and caterers is housefull ) होत आहे व लोकांचाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटत असल्याने बुकिंग धारकही आनंदी झाले आहेत.

author img

By

Published : Nov 1, 2022, 11:33 AM IST

Wedding Season 2022
लग्नकार्य

मुंबई : करोनाचे सावट दूर झाल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने ( Shinde Fadnavis Government ) सण उत्सवावर असलेले निर्बंध उठवल्याने दहीहंडी पासून गणपती, नवरात्र, दीपावली सर्व सण उत्सव जोरात सुरू असताना दुसरीकडे नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यात असणाऱ्या लग्न मुहूर्तासाठी मुंबईतील लग्न मंडप, कॅटरर्स हाऊसफुल्ल झाले आहेत. तब्बल दोन वर्षांनी लग्नमंडप व कॅटरर्सची बुकिंग हाऊसफुल्ल (Booking of wedding halls and caterers is housefull ) होत आहे व लोकांचाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटत असल्याने बुकिंग धारकही आनंदी झाले आहेत.

यंदा लग्नाचे बार धुमधडाक्यात उडणार : दीपावली नंतर आता तुळशी लग्नाच्या पाठोपाठ विवाहाच्या मुहूर्ताला सुरुवात होणार आहे. तब्बल दोन वर्षाच्या कालावधीनंतर पहिल्यांदा मुंबईमध्ये या विवाह सोहळ्यासाठी लग्नमंडप, कॅटरर्स चा व्यवसाय तेजीत होताना दिसून येत आहे. मुंबई व उपनगरातील जवळपास सर्व लग्नमंडप विवाह सोहळ्यासाठी बुकिंग झाले असून यंदा दोन वर्षापासून मंदावलेला त्यांचा धंदा तेजीत दिसत आहे. विशेष बाब म्हणजे वाढत्या महागाईने यांच्या बुकिंग दरामध्ये सुद्धा वाढ झाली असली तरी सुद्धा लोक आवर्जून बुकिंग करताना दिसत आहेत. काही लोकांनी करोनाच्या भीतीपोटी लग्नकार्य थोडक्यात न आटोपता धुमधडाक्यात व उत्साहात करण्यासाठी लांबणीवर ठेवलं होतं. त्या लग्नाचा बार आता धुमधडाक्यात दोन वर्षांनी फुटणार आहे. याच कारणासाठी अशी बरीच लग्न जी मागील दोन वर्ष रखडून राहिली होती किंवा लांबणीवर गेली होती त्या सर्वांचा आता या नोव्हेंबर -डिसेंबरच्या मुहूर्तामध्ये बार उडणार आहे.

बुकिंग जोरात : मुंबईत हजारोच्या संख्येने लग्नमंडप व कॅटरर्स आहेत. या यंदाच्या लग्नाच्या मुहूर्तासाठी झालेल्या बुकिंग बद्दल बोलताना मुंबईतील ऋतिका कॅटरर्सचे मालक राजू गावडे सांगतात की, करोना मध्ये मागील दोन वर्ष त्यांची परिस्थिती फारच हालाखीची होती. या व्यवसायावर अनेकांचे पोट अवलंबून असल्याकारणाने त्याचा मोठा फटका त्यांना बसला होता. परंतु यंदा त्यांचा व्यवसाय बऱ्यापैकी तेजीत आहे. नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यात असणाऱ्या लग्नकार्याच्या मुहूर्तासाठी बुकिंग सुद्धा मोठ्या प्रमाणात झाली आहे. यंदा वाढलेली महागाई बघता त्यांनी त्यांच्या दरामध्ये सुद्धा वाढ केली आहे. तरीसुद्धा लोक जास्त आढेवेढे न घेता मोठ्या हौशीने बुकिंग करत आहेत.

यंदा लग्नकार्यात मिरवायची हाऊस पूर्ण करणार ? करोनाचे सावट दूर झाल्याने आणि सरकारने त्या संबंधित लादलेले नियम रद्द केल्याने लग्न सराईला पुनश्च पूर्वीसारखी रंगत आता चढणार आहे. करोना काळात नाही म्हणता काही लग्न पार पडली. परंतु ती अत्यंत साधेपणाने झाल्याकारणाने त्यामध्ये अनेकांना मिरवायची असलेली हौस राहून गेली होती. मात्र यंदा अनेक विवाह इच्छुक मंडळींनी लग्न काळात ही हौस पूर्ण करायचं ठरवले असून त्यासाठी ते तयारीला सुद्धा लागले आहेत.लग्नकार्यासाठी नोव्हेंबर मध्ये २५,२६,२८ आणि २९ तसेच डिसेंबर मध्ये १,२,४,७,८,९ आणि १४ हे शुभ मुहूर्त आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.