ETV Bharat / state

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवार उपस्थित - NCP and congress decision for sena

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आज बुधवारी रात्री साडेसात वाजता बैठक होणार होती. मात्र, ही बैठक रद्द करण्यात आली असल्याचे अजित पवारांनी सांगितले. त्यानंतर पुन्हा बैठक सुरू झाली होती.

काँग्रेस, राष्ट्रवादी बैठक
author img

By

Published : Nov 13, 2019, 7:44 PM IST

Updated : Nov 14, 2019, 2:52 AM IST

मुंबई - राज्यात नव्याने सत्ता स्थापन करण्यासाठी सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेस यांचे समीकरण जुळण्याच्या तयारीत असतानाच आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या समन्वय समितीची पहिली बैठक रद्द झाली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले होते. मात्र, पुन्हा बैठक सुरू झाली.

सायंकाळी साडेसात वाजता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या समन्वय समितीची पहिलीच बैठक निश्चित झाली होती. या बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल यासाठीची माहिती घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे सिल्वर ओक बंगल्यावर शरद पवार यांच्या भेटीसाठी आले होते. त्यांची ही भेट तब्बल २० मिनिटांपेक्षा अधिक काळ चालली. या भेटीमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली? हे अद्याप बाहेर आले नसले, तरी अजित पवार मात्र तावातावाने बाहेर आले होते. आजची बैठक रद्द झाली आणि मी बारामतीला चाललो, असे त्यांनी सांगितले होते. मात्र, आता बैठक सुरू झाली.

काँग्रेस, राष्ट्रवादीचा सर्वसमावेश कार्यक्रम ठरल्यानंतर सेनेसोबत चर्चा - जयंत पाटील

जनतेच्या हिताचे निर्णय महत्त्वाचे असल्याने आम्ही लवकर निर्णय घेणार आहोत. सत्ता स्थापन करण्यासाठी सेनेसोबत चर्चा सुरू आहे. मात्र, त्यापूर्वी आमचा सर्वसमावेश विषयावर कार्यक्रम ठरला पाहिजे. त्यासाठीच काँग्रेस नेत्यांबरोबर बैठक असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला. त्यामुळे युती तुटली असे आम्ही मानत असल्याचे देखील पाटील म्हणाले. शरद पवार यांच्यासोबत अजित पवार आणि जयंत पाटील यांची सिल्वर ओक येथे बैठक होत आहे. यामध्ये काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसोबत होणाऱ्या बैठकी संदर्भात प्रामुख्याने चर्चा केली जात आहे. तसेच कोणत्या विषयाला प्राधान्य द्यायचे हे देखील ठरवण्यात येणार आहे. तसेच काँग्रेसोबत चर्चा झाल्यानंतर सेनेसोबत चर्चा केली जाणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

Last Updated : Nov 14, 2019, 2:52 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.