ETV Bharat / state

BMC Administration Information : निवासी डॉक्टरांच्या मागण्या १५ दिवसांत सोडवू : पालिका प्रशासनाची माहिती

author img

By

Published : Jan 2, 2023, 10:18 PM IST

आपल्या विविध मागण्यांसाठी ( BMC will Solve Demands of Resident Doctors ) निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. या संपात पालिका रुग्णालयातील २ हजार ( Municipal Administration Information ) डॉक्टर उतरले आहेत. संपामध्ये ( We will Solve Demands of Resident Doctors in 15 Days ) सहभागी झालेल्या महापालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या मागण्यांवर कार्यवाही सुरू आहे. येत्या १५ दिवसांमध्ये या मागण्या पूर्ण होतील, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली.

We will Solve Demands of Resident Doctors in 15 Days : Municipal Administration Information
निवासी डॉक्टरांच्या मागण्या १५ दिवसांत सोडवू : पालिका प्रशासनाची माहिती

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध रुग्णालयांती निवासी ( BMC will Solve Demands of Resident Doctors ) डाॅक्टरांनी ( We will Solve Demands of Resident Doctors in 15 Days ) म्हणजेच आता संप पुकारला आहे. त्यांच्या विविध मागण्या त्यांनी सरकारकडे वेळोवेळी मांडल्या. परंतु, त्या मागण्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. तसेच सायन हाॅस्पिटमधील ( Municipal Administration Information ) निवासी डाॅक्टरला पेशंटच्या नातेवाईकाकडून मारहाण केल्याच्या निषेधार्थ राज्यभरातील सर्व डाॅक्टरांनी संप पुकारला आहे. महानगरपालिका आणि राज्यातील सरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना भेडसावणारे प्रश्न आणि त्यांच्या विविध मागण्या या वैद्यकीय शिक्षण विभाग आणि मुंबई महापालिकेकडे ‘मार्ड’ संघटनेने वारंवार मांडल्या आहेत. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे असा आरोप संघटनेने केला आहे.

दोनच मागण्या पालिकेशी संबंधित महागाई भत्ता, सहयोगी प्राध्यापकांची रिक्त पदे भरणे, वसतिगृहाच्या समस्या, मुंबई महानगरपालिकेकडून दर महिना मिळणारा प्रलंबित कोविड भत्ता या कारणांमुळे राज्यभरात आजपासून सात हजार निवासी डॉक्टरांनी 'काम बंद आंदोलन' केले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या केईएम, नायर, सायन, कुपर आदी रुग्णालयांमधील २ हजार डॉक्टर्स या संपात सहभागी झाले आहेत. यावर बोलताना यातील बहुतेक मागण्या या राज्य सरकारशी संबंधित आहेत. तर करोना काळात देण्यात येणारा कोविड भत्ता आणि वसतिगृह या दोनच मागण्या पालिकेशी संबंधित आहेत, असे डॉ. संजीवकुमार यांनी सांगितले.

१५ दिवसांत प्रश्न सुटेल पालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या कोविड भत्त्याबाबत कार्यवाही सुरू आहे. येत्या दोन-तीन दिवसांत यावर निर्णय होईल. तसेच वसतिगृहाची कामे सुरू आहेत. शिवडी येथील ॲकवर्थ रुग्णालय आणि कुपर रुग्णालयात नवे वसतिगृह सुरू होत आहे. नायर दंत वैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृहातील फर्निचरचे काम सुरू आहे. या वसतिगृहात नायर दंत रुग्णालयाचे डॉक्टर राहण्यासाठी आल्यावर ते सध्या राहत असलेल्या करीरोड येथील वसतिगृहात केईएममधील डॉक्टरांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येईल. त्यामुळे येत्या १५ जानेवारीपर्यंत ४०० डॉक्टरांच्या राहण्याचा प्रश्न सुटेल. तसेच हाजीअली येथील वसतिगृहाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. संजीव कुमार यांनी दिली.

रखडललेल्या विविध मागण्यांसाठी संप राज्यातील 7 हजारांपेक्षा जास्त निवासी डॉक्टर आजपासून संपावर आहेत. रखडललेल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडणार आहे. अतिदक्षता विभाग वगळता इतर सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मागील एका वर्षांपासून कित्येक बैठका होऊनही अजुन कोणतीच मागणी मान्य न झाल्याने डॉक्टरांनी आंदोलन सुरु केलंय. आज मार्ड संघटनेने संपाचा इशारा दिला होता. आता जेजे रुग्णालय परिसरात मार्ड संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष अविनाश दहीपळे उपस्थित आहेत. तसेच संघटनेचे अनेक सदस्य जमण्यास सुरुवात झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.