ETV Bharat / state

भीती तर आहे, पण कामावर तर जावेच लागणार.. एसआरएसह म्हाडा कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया

लॉकडाऊनच्या नियमातील नव्या बदलानुसार आता सरकारी कार्यालयात 33 टक्के उपस्थिती असणार आहे. त्यानुसार वांद्र्याच्या रेड झोनमधील एसआरए, म्हाडा, एमएमआरडीए आणि एफडीए कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढणार आहे.

we scared about covid 19 but will have to do work said employee of mhada
भीती तर आहे, पण कामावर तर जावेच लागणार.. एसआरएसह म्हाडा कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया
author img

By

Published : May 2, 2020, 9:15 PM IST

मुंबई - कोरोनाचा कहर सुरू असून मनात खूप भीती आहे. घरातून बाहेर पडण्याची इच्छा नाही. नोकरी आहे तर करावीच लागेल. कामावर जावेच लागेल. आता फक्त काळजी घेणे आमच्या हातात आहे, ही प्रतिक्रिया आहे, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणा तील (एसआरए) एका कर्मचाऱ्याची. नाव न छापण्याच्या अटीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली असून, आता त्यांना सोमवारपासून कार्यालय गाठावे लागणार आहे. तेही एसटीने 44 किमीचा प्रवास करत यावे लागणार असल्याने त्यांची धाकधुक वाढली आहे.

लॉकडाऊनच्या नियमातील नव्या बदलानुसार आता सरकारी कार्यालयात 33 टक्के उपस्थिती असणार आहे. त्यानुसार वांद्र्याच्या रेड झोनमधील एसआरए, म्हाडा, एमएमआरडीए आणि एफडीए कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढणार आहे. आतापर्यंत 5 टक्के अधिकारी उपस्थित राहायचे. पण आता ही कार्यालये कंटेंमेंट झोनमध्ये नसल्याने आता 33 टक्के कर्मचारी असणे आवश्यक असणार आहे. त्यानुसार आता कर्मचारी- अधिकारी ही मानसिकदृष्टया तयार झाले आहेत.

कधी तरी कामावर जायचेच आहे किती दिवस हे टाळणार, अशी प्रतिक्रिया म्हाडातील एका कर्मचाऱ्याने दिली आहे. दरम्यान अनेक अधिकारी-कर्मचारी हे मुंबईबाहेरून येणारे असून, त्यांना एसटीने प्रवास करावा लागणार आहे. तर कुणाचा संसर्ग कामादरम्यान होणार नाही ना? कशी कळजी घ्यावी हाच विचार त्यांच्या डोक्यात आहे.
सर्व कार्यालयात सॅनिटायझर्ससह इतर सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. पण ये-जा करण्याची सोय नसणे ही खूप काळजीची बाब त्यांच्या साठी आहे. असे असताना एमएमआरडीए मात्र कर्मचाऱ्यांची चांगली काळजी घेताना दिसत आहे.

एमएमआरडीएने सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी गाडीची सोय केली आहे. तर त्यांच्या जेवणाची सोय ही उपहारगृहात केली आहे. तर काहीही लक्षणे दिल्यास त्वरित टेस्ट करण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे. तर एफडीए अत्यावश्यक सेवेत येत असल्याने त्यांचे अधिकारी/कर्मचारी सुरुवातीपासूनच कामावर आहेत. अधिकाधिक कर्मचारी फिल्डवर असल्याने त्यांची चिंता नेहमीच वाढलेली असते. आता सोमवारपासून मुंबईतील वर्दळ वाढणार असल्याने कोरोनाची लागण वाढणार का हाच आता प्रश्न निर्माण झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.