मुंबई - सामनाच्या रोखठोकमध्ये संजय राऊत यांनी पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालावर भाष्य करत कॉंग्रेसवर आणि कॉंग्रेसच्या नेतृत्त्वावर टीका केली होती. या टीकेचा नाना पटोले यांनी समाचार घेतला. 'आम्ही सामना वृत्तपत्र वाचत नाही', असे नाना पटोले म्हणाले आहेत. 'आम्ही त्यांच्या भाष्याकडे दुर्लक्ष करतो. दुसऱ्याकडे बोट दाखवल्यावर स्वतः कडे चार बोट असतात हे त्यांनी विसरु नये, असा संजय राऊत यांना लगावला आहे. तसेच काँग्रेस येणाऱ्या निवडणुका या स्वबळावर लढणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
फडणवीसांनी राजकारण करू नये -
कोविडच्या परिस्थितीवर राज्यात राजकारण करु नये, असे म्हणत नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला. विरोधीपक्षांकडून राजकारण केले जात आहे. फडणवीसांनी कोविडप्रश्नी राजकारण करु नये, असा सल्लाही त्यांनी फडणवीसांना दिला. तसेच एकीकडे देशात कोरोनाचे तांडव सुरु होते आणि दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार सभेत मग्न होते, असे म्हणत पटोले यांनी नरेंद्र मोदींवरही टीका केली. यावेळी सब्रहन्यम स्वामींकडूनदेखील नेतृत्व बदलाबाबत केलेल वक्तव्यदेखील नाना पटोलेंनी आज अधोरेखित केले.
मराठा आरक्षण प्रश्नही सर्व अधिकार केंद्राकडे -
गायकवाड कमिशन नंतर दुसरा कमिशन बसून काहीही साध्य होणार नाही. कारण एकाद्या समाजला मागास ठरवण्याचे अधिकार केंद्र सरकरला आहे. दरम्यान, पटोले यांची राज्य सरकारला कानपिचक्या दि्ल्या आहेत. राज्य सरकार नवीन कमिशन लागू करण्याच्या हालचाली सुरू असताना पटोले यांनी राज्य सरकरला यासंदर्भात सुनावले आहे.
हेही वाचा - अंत्यविधीसाठी लाकडांची मागणी वाढली; लाकडाला पर्याय शोधण्याची प्रशासनाकडे मागणी