मुंबई - कोरोनाशी युद्ध लढत असतानाच निसर्ग चक्रीवादळ देखील घोंघावू लागले. त्यामुळे मुंबईतील जुहू येथे समुद्राला भरती आली असून पोलीस, अग्निशमन दलाचे जवान, लाइफगार्ड समुद्रकिनारी तैनात करण्यात आले आहे.
मुंबईत काल रात्रीपासूनच पाऊस सुरू आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेच्या दृष्टीने मुंबईत रात्रीच राज्य शासन व मुंबई पालिकेकडून हायअलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने जुहू समुद्रकिनारी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने घेतलेला आढावा.