ETV Bharat / state

Water supply cut off : कुर्ला, घाटकोपर, चेंबूर मध्ये या दिवशी पाणीपुरवठा बंद ! - बृहन्‍मुंबई महानगरपालिका

मुंबई महापालिकेद्वारे (Greater Mumbai Municipal Corporation) घाटकोपर येथील सोमय्या नाल्याखालून मायक्रोटनेलिंग पद्धतीने जलवाहिन्या वळविण्याचे फेज १ चे काम केले जाणार आहे. या कामासाठी १८ व १९ मे रोजी २४ तास कुर्ला, घाटकोपर, चेंबूर या विभागात पाणी पुरवठा बंद (Water supply cut off in Kurla, Ghatkopar, Chembur) राहणार आहे. तर सायन, वडाळा, दादर, परेल, लालबाग आदी विभागात पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे.

Water supply cut
पाणीपुरवठा बंद
author img

By

Published : May 11, 2022, 10:35 PM IST

मुंबई: बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे पूर्व उपनगरामध्ये घाटकोपर येथील ‘एन’ विभागातील सोमैया नाल्याखालून महापालिका वसाहत, विद्याविहार या ठिकाणी सूक्ष्मबोगदा (मायक्रोटनेलिंग) पद्धतीने जलवाहिन्या वळविण्याचे फेज १ चे काम बुधवार, दिनांक १८ मे २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजेपासून गुरुवार, दिनांक १९ मे २०२२ सकाळी १०.०० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. १८ मे रोजी सकाळी १० वाजेपासून गुरुवार, दिनांक १९ मे २०२२ सकाळी १० वाजेपर्यंत मुंबईतील पूर्व उपनगरांमध्ये काही भागात पाणीपुरवठा बंद राहील.

परिसरातील नागरिकांनी पाणी कपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. कुर्ला ‘एल पूर्व’ विभाग - राहूल नगर, एडवर्ड नगर, पानबजार, व्ही. एन. पूरव मार्ग, नेहरु नगरच्या दोन्ही बाजू, जागृती नगर, शिवसृष्टी नगर, एस. जी. बर्वे मार्ग, कसाईवाडा पंपिंग, हिल मार्ग, चाफे गल्ली, चुनाभट्टी पंपिंग स्वदेशी मिल मार्ग या विभागात पाणी बंद राहणार आहे.

घाटकोपर ‘एन’ विभाग - राजावाडीचे सर्व क्षेत्र, (एम. जी. मार्गाची पश्चिम बाजू), चित्तरंजन नगर, वसाहत, आंबेडकर नगर, निळकंठ व्हेली, राजावाडी रुग्णालय परिसर, विद्याविहार स्थानक, पूर्व बाजूचा रस्ता, ओ. एन. जी. सी. वसाहत मोहन नगर, कुर्ला टर्मिनल मार्ग, ओघड भाई रस्ता, आनंदी रस्ता रामजी, आशर रस्ता चेंबूर ‘एम पश्चिम’ विभाग - टिळक नगर सर्व क्षेत्र, ठक्कर बाप्पा वसाहत, वत्सलाताई नगर, सहकार नगर, आदर्श नगर, राजा मिलिंद नगर, राजीव गांधी नगर, गोदरेज आवार, कुटीरमंडल, सम्राट अशोक नगर, बीट नंबर १४९ व १५१ सायन वडाळा ‘एफ उत्तर’ विभाग - वडाला ट्रक टर्मिनल, न्यु कफ परेड, प्रतिक्षा नगर, पंचशिल नगर, शीव पूर्व आणि पश्चिम (बुस्टींग), सायन कोळीवाडा, संजय गांधी नगर, के. डी. गायकवाड नगर, सरदार नगर, इंदिरा नगर, वडाला मोनोरेल डेपो भागात पाणी बंद राहील.

दादर परेल ‘एफ दक्षिण’ विभाग - शहर उत्तर - दादर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, जगन्नाथ भातनकर मार्ग, बी. जे. देवरुककर मार्ग, गोविंदजी केणे मार्ग, हिंदमाता या
परळ लालबाग शहर दक्षिण– परळ, लालबाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, डॉ. एस. एस. राव मार्ग, दत्ताराम लाड मार्ग, जिजीभॉय गल्ली, महादेव पालव मार्ग, साने गुरुजी मार्ग, गॅस कंपनी गल्ली या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

हेही वाचा : Mumbai Ac Local Train : हार्बर मार्गावरील एसी लोकल 'या' दिवसापासून बंद; मुख्य मार्गावर फेऱ्या वाढणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.