ETV Bharat / state

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात ८२ टक्के पाणीसाठा; पाणी कपात होणार रद्द - तुळशी धरण

मुंबईला मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तुळशी व विहार या सात धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. आज १८ ऑगस्टला धरणात ८२ टक्के पाणीसाठा जमा आहे. यामुळे लवकरच मुंबईत सुरू असलेली २० टक्के पाणीकपात रद्द केली जाईल अशी माहिती पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून देण्यात आली आहे.

water-level-increased-in-seven-dams-of-mumbai
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत ८२ टक्के पाणीसाठा
author img

By

Published : Aug 18, 2020, 11:24 AM IST

मुंबई - सध्या मुंबईत अधून मधून पाऊस पडत असला तरी धरणक्षेत्रात मात्र चांगलाच पाऊस पडत आहे. यामुळे शहराला पाणीपुरावठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठ्यात सतत वाढ होत आहे. आज १८ ऑगस्टला धरणात ८२ टक्के पाणीसाठा जमा आहे. यामुळे लवकरच मुंबईत सुरू असलेली २० टक्के पाणीकपात रद्द केली जाईल, अशी माहिती पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून देण्यात आली आहे.

मुंबईला मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तुळशी व विहार या सात धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधून दरदिवशी ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. तलावातील पाण्याच्या पातळीत घट होत असल्याने ५ ऑगस्टपासून २० टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. परंतु, सध्या धरण क्षेत्रात सतत पडणाऱ्या पावसामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात ८२ टक्के पाणीसाठा
४ ऑगस्ट रोजी सातही धरणातील पाणीसाठा ५ लाख ५ हजार ८९६ इतका होता. परंतु, तलावांत पावसाची संततधार सुरूच असून सध्या म्हणजेच १८ ऑगस्ट सकाळी ६ वाजेपर्यंत सातही धरणांत ८२.९५ टक्के म्हणजेच १२ लाख ०० हजार ६४२ दशलक्ष लिटर पाणी साठा जमा झाला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारी सर्व धरणे काठोकाठ भरायला सुमारे अडीच लाख दशलक्ष लिटर पाणी साठ्यात वाढ होण्याची गरज आहे. सात धरणांपैकी २७ जुलैला तुळशी तर ५ ऑगस्टला विहार तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. सध्या मुंबईत २० टक्के पाणी कपात केली असली तरी धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरुच आहे. त्यामुळे मुंबईकरांची वर्षभराची तहान भागेल इतका पाणीसाठा ऑगस्ट अखेरपर्यंत जमा होईल, असा विश्वास पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मागील दोन वर्षांपेक्षा पाणीसाठा कमीच - १८ ऑगस्ट सकाळी ६ वाजेपर्यंत सातही धरणांत ८२.९५ टक्के म्हणजेच १२ लाख ६४२ दशलक्ष लीटर पाणीसाठा जमा झाला आहे. मागील वर्षी म्हणजेच २०१९ मध्ये आजच्याच दिवशी ९४.२० टक्के म्हणजेच १३ लाख ६३ हजार ४०३ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा होता. आजच्याच दिवशी २०१८ मध्ये १२ लाख १८ हजार २२२ इतका म्हणजेच ९१.०८ टक्के पाणीसाठा जमा होता. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी धरणात पाणीसाठा कमी आहे. १८ ऑगस्टपर्यंतचा सातही धरणांतील पाणीसाठा (दशलक्ष लिटर) - अप्पर वैतरणा - १,५३,६५६मोडक सागर - १,२७,४१०तानसा - १,२९,३९३ मध्य वैतरणा - १,७३,४१८भातसा - ५,८१,०२१विहार - २७,६९८तुळशी - ८,०४६एकूण - १२,००,६४२

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.