ETV Bharat / state

water extract machine : मध्य रेल्वेच्या स्थानकावर अखेर हवेतून पाणी काढण्याचे मशीन झाले सुरू - हवेतून पाणी काढण्याचे मशीन

हवेतून पाणी काढण्याचे मशीन मध्य रेल्वे स्थानकावर सुरू झाले ( water extract machine ) आहेत. छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर मेघदूत पाणी वाटप केंद्र असे त्या मशीनचे नाव ( water extract machine at Central Railway station ) आहे. या पाण्याचे दर हे बाजार भावाच्या तुलनेत कमी आहे.

water extraction machine
हवेतून पाणी काढण्याचे मशीन
author img

By

Published : Dec 22, 2022, 1:20 PM IST

हवेतून पाणी काढण्याचे मशीन

मुंबई : हवेतून पाणी काढण्याचे मशीन आणि ते छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर होय सुरू झालेला ( water extract machine ) आहे. फक्त बारा रुपये लिटर स्वच्छ निर्मळ शुद्ध पाणी कोणालाही मिळू शकेल. मध्य रेल्वेने काही महिन्यांपूर्वी घोषणा केली होती तो प्रकल्प प्रत्यक्षात मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर सुरू झाला आहे

'मेघदूत' यंत्र : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील सहा रेल्वे स्थानकांवर आता नव्या तंत्रज्ञानाने पिण्याचे पाणी उपलब्ध झाले ( machine water extract from air ) आहे. या स्थानकांवरील हवेतून पाणी तयार करणाऱ्या यूएन-मान्यताप्राप्त तंत्रज्ञानाद्वारे तयार केले आहे. अ‍ॅटमॉस्फेरिक वॉटर जनरेशन (AWG) 'मेघदूत' हे एक यंत्र आहे जे कंडेन्सेशन विज्ञान वापरून सभोवतालच्या हवेतून पाणी काढते. हे पाणी आता रेल्वे स्थानकांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या वर्षी जूनमध्ये, युनायटेड नेशन्स ग्लोबल कॉम्पॅक्टने भारताकडून जल व्यवस्थापनासाठी जागतिक शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) साठी या उपक्रमाला मान्यता दिली.

बाजारापेक्षा कमी दरामध्ये पाणी : यासंदर्भात या संपूर्ण प्रकल्पाचे व्यवस्थापक म्हणून काम पाहणारे भारतीय नेव्हीमधून निवृत्त झालेले कॅप्टन के के शर्मा यांनी ईटीव्ही भारत शी संवाद साधताना सांगितले की," अनेक महिन्यांपासून जनतेची इच्छा आता पूर्ण झाली ( water extract machine at Central Railway station ) आहे. छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक येथे फलट क्रमांक सहा फलाट क्रमांक एक आता हवेतून पाणी काढण्याचे हे युनिट आम्ही सुरू केलेले आहे. मेघदूत या नावाने हे आमचे युनिट काम करते आम्ही लोकांना बाजारापेक्षा कमी दरामध्ये हे पाणी पुरवत आहोत. जर जनतेने आपली स्वतःची बाटली या ठिकाणी आणली तर बारा रुपये लिटर पाणी दिले जाईल जर आमची बाटली असेल तर पंधरा रुपये लिटर पाणी मिळेल."

या रीतीने असतील पाण्याचे दर : ग्राहकांची स्वतःची बाटली असेल तर हे दर प्रति लिटर 15 रुपये असतील. आपली बाटली असेल तर अर्धा लिटर 8 रुपये दर असताली. 300 मिलीलिटरसाठी केवळ 5 रुपये दर असतील. जर बाटली आपली नसेल तर दर एक लिटर साठी पंधरा रुपये, अर्धा लिटरसाठी बारा रुपये आणि 300 मिलिलीटरसाठी सात रुपये दर असतील.

छत्रपती शिवाजी महाराज स्थानक : छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक सहा आणि सात यांच्यामध्ये जे युनिट सुरू झालेले आहे. तिथले युनिट चालवणारे गिरीश भुरीच्या म्हणाले की," हवेतून पाणी काढण्याचे मशीन कालपासूनच सुरू झालेले आहे. लोकांना शुद्ध आणि निर्मळ पाणी देण्याचा आमचा प्रयत्न आहे."

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.