मुंबई- भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. शिवरायांच्या वाघनखाबाबत संशय व्यक्त करणं म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि शिवरायांच्या कर्तृत्वाचा अपमान करणे आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर अत्यंत अशलाघ्य शब्दात टीका केली. तसेच आदित्य ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत का, असे आक्षेपार्ह वक्तव्य केले.
काय म्हणाले होते आदित्य ठाकरे - छत्रपती शिवरायांच्या वाघ नखांसाठी परदेशात जाणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनी वाघनखे नक्की शिवरायांनी वापरलेली आहेत का, याची तपासणी करावी असे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच सरकारी पैशाने परदेश वाऱ्या नेत्यांनी करू नयेत. मौज-मजा करण्यासाठी स्वतःचे पैसे वापरावेत, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.
एकदा वेशांतर करून फिरा. तुमची लुटारू गँग म्हणून ओळख आहे. तर देवेंद्र फडणवीस यांची ओळख ही देवमाणूस म्हणून आहे. तुम्ही स्वतःला आवरा नाही. अन्यथा कोविड काळात कसे महाराष्ट्राला लुटले, ते आम्हाला आकड्यासहित बाहेर काढावे लागेल-भाजपा आमदार राम कदम
अभ्यासात 'ढ' असणारे आदित्य- या मुद्द्यावर बोलताना भाजपा नेते आमदार राम कदम म्हणाले की, अभ्यासात 'ढ' असणारे आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा धसका घेतला आहे. आमदार राम कदम म्हणाले, आदित्य अहो, जपानहून उद्योग मुंबई आणि महाराष्ट्रात आले. मराठी माणसाला नोकरी मिळाली तर तुम्हाला बघवत नाही का? तुम्ही मुंबईला डांबरी खड्डे असेलले रोड दिले आहेत. पण सिमेंट काँक्रेटचे रस्ते दिले नाहीत. दरवर्षी टेंडर काढून स्वतःचे घर भरता यावे म्हणून हे सर्व केले आहे.
यह रिश्ता क्या कहलाता है? दुसरीकडे या मुद्द्यावर बोलताना भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष, संजय पांडे म्हणाले आहेत की, संजय राऊत हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांकडे पुरावे मागतात. आदित्य ठाकरे हे छत्रपति शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे मागतात. आखिर यह रिश्ता क्या कहलाता है? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करून राजनैतिक पोळी भाजणारे हे वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत आहेत. या महाराष्ट्रातील जनता आणि हिंदू समाज यांना कदापि माफ करणार नाही.
वाघनखे ही छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाचे प्रतिक- राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवरायांनी वापरलेली वाघनखे लंडनमधील संग्रहालयातून लवकरच महाराष्ट्रात येतील, असे जाहीर केले आहे. या संदर्भात चर्चा पूर्ण झाली आहे. येत्या तीन नोव्हेंबरला या संदर्भातील करार करण्यात येणार आहे. त्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार रविवारी लंडनकडे रवाना होणार आहेत. वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासाठी हा करार अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. छत्रपती शिवरायांनी अफजल खान वधात वापरलेली वाघ नखे ही महाराष्ट्रातील जनतेची अस्मिता आहे. वाघनखे ही छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाचे प्रतिक आहे. त्यामुळे येत्या 16 नोव्हेंबरला ही वाघ नखे महाराष्ट्रात येतील, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
हेही वाचा-