मुंबई - लोकसभा निवडणुकाच्या सहाव्या टप्प्यासाठी आज मतदान होणार आहे. या टप्प्यात देशातील ५९ जागांवर मतदान होणार असून यात सात राज्यांतील लोकसभेच्या जागांचा समावेश आहे. सुमारे १ लाख मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून ९७९ उमेदवार निवडणुकाच्या रिंगणात आहेत. तर सुमारे १० कोटी १६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
आज ५९ मतदारसंघात मतदान होणार असून उत्तर प्रदेश -१४, हरियाणा -१०, बिहार -८, मध्यप्रदेश-८, पश्चिम बंगाल -८, नवी दिल्लीतील ७ जागांचा समावेश आहे. बहुतांश लोकसभा मतदारसंघामध्ये सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. झारखंड आणि बिहारमधील काही संवेदनशील मतदारसंघात दुपारी चार वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया होणार आहे.
देशात एकूण सात टप्प्यात मतदान होत असून यापैकी पाच टप्पे पार पडले आहेत. पहिल्या टप्प्यात २० राज्यात ९१ मतदारसंघामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये १३ राज्यात ९७ मतदारसंघामध्ये, तिसऱ्या टप्प्यात १४ राज्यामध्ये ११५ मतदारसंघात, चौथ्या टप्प्यात नऊ राज्यात ७१ मतदारसंघात तर पाचव्या टप्प्यात सात राज्यात ५१ मतदारसंघांमध्ये मतदानाती प्रक्रिया पार पडली.
सहाव्या टप्प्यात केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह, रवी शंकर प्रसाद, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह, ज्योतिरादित्य शिंदे, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, केंद्रीय मंत्री मेनका गांधी, हर्षवर्धन, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर हे सहाव्या टप्प्यातील प्रमुख उमेदवार आहेत.