ETV Bharat / state

राज्यातील १० मतदारसंघात उद्या मतदान, 'या' दिग्गजांच्या भवितव्याचा होणार फैसला - navnit kour

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, हिंगोली, परभणी, नांदेड, अमरावती, अकोला, बुलडाणा या एकूण १० मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या टप्प्यातील काही मतदारसंघातील तिरंगी आणि चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. त्या अनुषंगाने या सर्वच मतदारसंघात कोणाकोणत्या दिग्गज उमेदवारांमध्ये लढत होणार आहे

या' दिग्गजांच्या भवितव्याचा होणार फैसला
author img

By

Published : Apr 17, 2019, 1:14 PM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात दुसऱ्या टप्प्यासाठीचे मतदान उद्या पार पडणार आहे. या टप्प्यामध्ये देशातील एकूण ९६ मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यात राज्यातील एकूण १० मतदारसंघाचा समावेश आहे. दरम्यान या मतदानाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा मंगळवारी सायंकाळी थंडावल्या. आता या मतदारसंघातून नशीब आजमावणाऱ्या सर्व उमेदवारांचे भविष्य उद्या (गुरुवारी) ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, हिंगोली, परभणी, नांदेड, अमरावती, अकोला, बुलडाणा या एकूण १० मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या टप्प्यातील काही मतदारसंघातील तिरंगी आणि चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. त्या अनुषंगाने या सर्वच मतदारसंघात कोणाकोणत्या दिग्गज उमेदवारांमध्ये लढत होणार आहे, याचा घेतलेला संक्षिप्त आढावा पुढील प्रमाणे.

सोलापूर-

दुसऱ्या टप्प्यात मदतान होणारा पश्चिम महाराष्ट्रातील हा एकमेक मतदारसंघ आहे. या मंतदारसंघातील निवडणूक अत्यंत लक्षवेधी असून चुरशीही आहे. या ठिकाणी काँग्रेस-भाजप- वंचित बहूजन आघाडी या अशी तिहेरी लढत होणार आहे. यामध्ये काँग्रसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे शेवटची निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितलेय. तर भाजपने हिंदूत्वाचे कार्ड वापरून लिंगायत धर्मगुरू जय सिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकंरानी या मतदारसंघात काँग्रेस-भाजप उमेदवारांपुढे कडवे आव्हान उभे केले आहे.

या मतदारसंघात कोणाचे पारडे जड राहणार.. काँग्रेसचे उमेदवार शिंदे त्यांची शेवटची निवडणूक जिंकणार... की, विद्यमान खासदाराचे तिकीट कापून स्वामींना उमेदवारी दिलेला भाजप हा गड राखणार... किंवा या दोघांची स्वप्ने धुळीला मिळवत प्रकाश आंबेडकर विजयाचा गुलाल उडवणार.. हे २३ मे ला स्पष्ट होईल. या मतदारसंघात एकूण १३ उमेदावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

उस्मानाबाद-

मराठवाड्यामध्ये समावेश असलेला उस्मानाबाद मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. या ठिकाणी शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. या मतदारंसघातील ही निवडणूक भाऊबंधकीतील लढत म्हणून अधिक चर्चेत आहे. कारण यावेळी दोन चुलत भावांमध्येच ही लढत होत आहे. आघाडीकडून राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह पाटील यांना मैदानात उतरवले आहे. तर युतीकडून शिवसेनेने विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांचा पत्ता कट करून ओमप्रकाशराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून अर्जुन सलगर हे निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात एकूण १४उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

बीड -

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने बीड लोकसभा मतदारसंघ हा अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जातो. या मतदारसंघामध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या मतदारसंघामध्ये राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी युतीच्या उमेदवारासाठी आणि विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आघाडीच्या उमेदवारासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. या मतदारसंघात युतीकडून भाजपच्या विद्यमान खासदार प्रीतम मुंडे तर आघाडीकडून राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे मैदानात उतरलेत. संपूर्ण राज्याचे या लढतीकडे लक्ष लागले असून, अत्यंत तुल्यबळ अशी ही लढत समजली जात आहे. राष्ट्रवादीने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केल्याचे चित्र सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे. तर या मतदारसंघात फोडाफोडीच्या राजकारणालाही गती मिळाली आहे. शिवसंग्रामप्रमाणे राष्ट्रवादीला पाठिंबा देणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. या मतदारसंघात एकूण ३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

लातूर -

लातूर लोकसभेची निवडणूक काँग्रेससाठी अस्तित्वाची तर भाजपासाठी प्रतिष्ठेची होत आहे. या मतदारसंघात काँग्रेसकडून मच्छिंद्र कामत, भाजपकडून सुधाकर श्रृंगारे तर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राम गारकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 'दोघात तिसरा' या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे यंदाची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे. श्रृगांरे हे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या गोटातले आहेत. तर लातूर शहर आणि लातूर ग्रामीण मतदार संघावर आजही देशमुखांची मजबूत पकड आहे. ग्रामीण भागात साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे संघटन तर शहरात दिवंगत विलासराव देशमुख यांचे वलय आजही कायम आहे. त्यामुळे मतदार कामतांना कौल देणार की श्रृगांरेंना हे २३ मे लाच स्पष्ट होईल.

हिंगोली-

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं हिंगोली जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलच तापू लागले आहे. यावेळी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले सुभाष वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीकडून शिवसेनेचे नांदेड दक्षिणचे आमदार हेमंत पाटील हे मैदानात उतरलेत. त्यामुळे जनता ही रंगत अतितटीची होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. परभणी जिल्ह्यातून १९९९ मध्ये हिंगोली जिल्ह्याचे विभाजन झाले. तेव्हापासून या जिल्ह्याचा विकास खुंटलेला आहे. या जिल्ह्यातून विविध पक्षाचे नेते मंत्रीपदापर्यंत पोहचले मात्र, विकासासाठी कोणत्याही नेत्याने प्रयत्न केला नसल्याचा आरोप मतदारांनी केला आहे. त्यामुळे यावेळी मतदार कोणाल कौल देणार हा चर्चेचा विषय झाला आहे. या मतदारसंघातून एकूण २४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

परभणी-

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून परभणी लोकसभा मतदारसंघ ओळखला जातो. या मतदारसंघावर गेल्या ३० वर्षापासून शिवसेनेचा झेंडा फडकत आहे. मात्र, यावेळची लढत ही अत्यंत तुल्यबळ समजली जात आहे. यावेळी युतीकडून शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय जाधव यांनी संधी देण्यात आली आहे. तर आघाडीकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर हे मैदानात आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून अलमगीर खान तर भाकपकडून राजन क्षिरसागर हे निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघातून एकूण १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

नांदेड -

लोकसभा निवडणुकीत यंदा चांगलीच रंगत होणार आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला नांदेडमध्ये तरी यावेळेस काँग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान खासदार अशोक चव्हाणांची चांगलीच दमछाक होत आहे. या मतदारसंघात भाजपकडून प्रतापराव पाटील चिखलीकर रिंगणात उतरले आहेत. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यशपाल भिंगे यांनीदेखील या निवडणुकीतव चुरस निर्माण केली आहे. नांदेडमध्ये भाजपचे कमळ फुलवण्याचा 'प्रताप' घडवणेही वाटते तितके सोपे नाही. तर वंचित बहूजन आघाडीचे यशपाल भिंगे यांचा काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघात एकूण २ लाख ६३ हजार मतदारांची वाढ झाली असून हा नवखा मतदारही तेवढाच महत्त्वाचा ठरणार आहे. या मतदारसंघातून १४ जन निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.

अमरावती-

विदर्भातील या मतदारसंघात शिवसेनेचे दिग्गज नेते आणि विद्यमान खासदार आनंदराव अडसुळ यांना अपक्ष उमेदवार नवनीत राणा कौर यांचे कडवे आव्हान आहे. मागील लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघात जसे चित्र होते, तसेच चित्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही आहे. ५ वर्षांपूर्वी एकमेकांविरुद्ध लढलेले उमेदवार पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. मात्र, यावेळी मतदारसंघात मोदी लाट ओसरल्याचे चित्र आहे. शिवसेनेचे आनंदराव अडसूळ अमरावती मतदार संघात हॅटट्रिक साधण्याच्या तयारीत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा असलेल्या युवा स्वाभिमानच्या नवनीत-कौर राणा या गेल्या निवडणुकीपेक्षा बऱ्याच परिपक्व दिसत आहेत. विशेष म्हणजे मागील वेळी पराभव होताच दुसऱ्या दिवसापासूनच नवनीत राणा यांनी जिल्हा पिंजून काढणे, जनसंपर्क दांडगा करणे यासाठी बरेच परिश्रम घेतले आहेत.

अकोला-

अकोला लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप, काँग्रेस, आणि वंचित बहुजन आघाडीचे तेच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भाजपकडून विद्यमान खासदार संजय धोत्रे, काँग्रेसकडून हिदायत पटेल तर वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी अकोला मतदारसंघाची ओळख होती. मात्र, गेल्या तीन दशकांत काँग्रेसचा उमेदवार निवडून येऊ शकला नाही. तर प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळावर निवडणूक लढणे या ठिकाणी भाजपच्या पथ्यावर पडत गेल्याचा इतिहास आहे. त्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार की, काँग्रेस त्यांचा मतदारसंघ खेचून आणणार हे येणारा काळच ठरवेल. उद्या मतदाता आपले मतदान कोणाच्या पारड्यात टाकतोय याचे चित्र २३ 'मे' लाच स्पष्ट होईल.

बुलडाणा-

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं बुलडाणा लोकसभा मतदारसंघ हा अत्यंत प्रतिष्ठेचा मतदारसंघ समजला जातो. यावेळी या मतदारसंघातून आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे आणि युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आमदार बळीराम शिरस्कार यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने रंगत वाढली आहे. बुलडाणा लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी मराठा-आणि माळी समाजाची मते निर्णायक ठरणार आहेत. या मतदार संघात एकूण १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Intro:Body:

राज्यातील १० मतदारसंघात उद्या मतदान, 'या' दिग्गजांच्या भवितव्याचा होणार फैसला

नांडेड -

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.