धुळे - विधानपरिषदेच्या धुळे-नंदुरबार पोटनिवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. दोन्ही जिल्ह्यांमध्ये मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मतदान केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मतदान केंद्रांवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. निवडणुकीसाठी भाजपाकडून अमरीश पटेल तर महाविकास आघाडीकडून अभिजीत पाटील हे रिंगणात आहेत. दरम्यान, धुळे-नंदुरबार विधानपरिषद मतदारसंघात भाजपाचे पारडे जड असल्याने ही निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सकाळी आठ वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दोन्ही विधानपरिषद मतदारसंघातून 437 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तीन तारखेला धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे.
हेही वाचा -पदवीधर-शिक्षक निवडणुकांसाठी आज मतदान, पुणे-नागपूरमध्ये प्रतिष्ठा पणाला; पाहा LIVE अपडेट्स..
हेही वाचा -अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज करणार शिवसेनेत प्रवेश