ETV Bharat / state

Voters Number Increased : राज्यातील मतदारांची संख्या पाच लाखांनी वाढली - voters in Maharashtra increased by five lakh

Voters Number Increased : निवडणूक आयोगाच्या वतीनं मतदार यादी अंतिम करण्याचं काम सुरू आहे. प्रारूप मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध झाली असून आता अंतिम यादी तयार केली जाणार आहे. दरम्यान, प्रारूप यादीतील मतदारांची संख्या पाच लाखांनी वाढली आहे.

Voters Number Increased
Voters Number Increased
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 27, 2023, 10:40 PM IST

श्रीकांत देशपांडे माहिती देताना

मुंबई Voters Number Increased : लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचं अध्यायवतीकरण करण्याचं काम निवडणूक आयोगाकडून सुरू आहे. यासाठी दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जातो. 27 ऑक्टोबर 2023 रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप यादी प्रकाशित करण्यात आली आहे. यासंदर्भात माहिती देताना मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितलं, की राज्यात सत्तावीस ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीत हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरे : 18-19 नोव्हेंबर या कालावधीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी महिला, दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी विशेष शिबिरे राबवली जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या मतदान नोंदणीसाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, निवडणूक साक्षरता मंडळाचं सहकार्य, तर महिलांच्या मतदार नोंदणीसाठी महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ, राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या शासकीय विभागांचं सहकार्य घेण्यात येणार आहे. राज्यातील तृतीयपंथी व्यक्ती, भटकया विमुक्त जमाती यांच्यासाठी दोन, तीन डिसेंबरला विशेष शिबिर आयोजित केलं जाणार आहे. राज्यातील ग्रामविकास पंचायत राज विभागाच्या सहकार्यानं एक ते सात नोव्हेंबर या कालावधीत राज्यभर विशेष ग्रामसभेचं आयोजन केलं जाणार आहे. या ग्रामसभांमध्ये मतदार यादीचं वाचन होणार असून त्या अंतर्गत नव्यानं नाव नोंदणीस पात्र असलेल्यांना आपली नावे नोंद करायची आहेत. तर दुबार नावं मृत व्यक्ती गावातून स्थलांतरित झालेल्या व्यक्तींची नावं वगळण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे.

मतदारांची संख्या वाढली : 5 जानेवारी 2023 च्या मतदार यादीनुसार राज्यात नऊ कोटी दोन लाख 64 हजार 874 इतकी मतदारांची संख्या होती. 27 ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीतील एकूण मतदार संख्या नऊ कोटी आठ लाख 32 हजार 243 इतकी झाली आहे. एकूण लोकसंख्येच्या ही 71 पूर्णांक 41 टक्के इतकी आहे. यामध्ये 17 लाख 3 हजार 193 इतकी नवीन मतदान नोंदणी आहे, तर 11 लाख 35 हजार 804 एवढ्या मतदारांची नावं वगळलेली आहेत. एकूण मतदार यादीत साडेपाच लाख मतदारांची भर पडली आहे. 2023 मधील अंतिम मतदार यादीमध्ये पुरुष मतदारांची संख्या 4 कोटी 71 लाख 26 हजार 502 इतकी होती. आताच्या प्रारूप मतदार यादीनुसार चार कोटी 73 लाख 69 हजार 664 एवढे पुरूष मतदार आहेत. महिला मतदारांची संख्या जानेवारी 23 मध्ये चार कोटी 31 लाख 33 हजार 655 इतकी होती. ती आता चार कोटी, 34 लाख 57 हजार 679 इतकी झाली आहे. यामुळं 1000 पुरुषांच्या मागे आता 917 स्त्री आहेत. तृतीयपंथी समुदायाची संख्याही 4 हजार 717 वरून 4 हजार 920 इतकी झाली आहे, असंही श्रीकांत देशपांडे यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? भाजपाच्या 'त्या' व्हिडिओमुळं चर्चांना उधाण; पण लगेच डिलिट केला व्हिडिओ
  2. Sharad Pawar On Maratha Reservation : आश्वासनं पाळता येत नसतील तर देऊ नये; मराठा आरक्षणावरुन शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला
  3. Lalit Patil Case Update : ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात माजी महापौरांची पोलिसांकडून चौकशी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.