ETV Bharat / state

एक्झिट पोलमध्ये राज ठाकरेंना धक्का; मतदारांनी पुन्हा नाकारले? - MaharashtraAssemblyPolls

निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंची कोहिनूर प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी झाली. चौकशीनंतर बराच काळ राज ठाकरे जाहीरपणे काहीच बोलले नाही. त्यामुळे चौकशीनंतर राज ठाकरे शांत झाल्याची टीका त्यांच्यावर झाली. गेल्या अनेक निवडणुकांपासून मनसे सातत्याने पिछाडीवर जात आहे.

राज ठाकरे
author img

By

Published : Oct 21, 2019, 11:52 PM IST

मुंबई - यंदाच्या निवडणुकीत मनसेकडून सत्तेसाठी नाहीतर सक्षम विरोधी पक्ष होण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचे राज ठाकरेंनी जाहीर करून टाकले होते. एकादा पक्ष सभागृहात विरोधी पक्ष होण्यासाठी निवडणुका लढवत असल्याचे हे कदाचित देशातील पहिलेच उदाहरण असावे. त्यांची ही भूमिका लोकांना कितपत रूचली ही गुरुवारी निकाल समोर आल्यानंतर स्षष्ट होणार आहे. मात्र, मतदानोत्तर चाचणीमध्ये मनसेला ० ते २ जागा मिळतील असे सांगण्यात आल्याने मनसे फॅक्टर राज्यात चालणार नसल्याचे चित्र दिसत आहे.

हेही वाचा - एक्झिट पोल : सेना-भाजपला स्पष्ट बहुमत.. महायुतीला १९० ते २३० जागांचा अंदाज, भाजप ठरणार सर्वात मोठा पक्ष

लोकसभेची निवडणूक न लढता महाराष्ट्रात 'लाव रे तो व्हिडिओ' असे म्हणत राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांच्या अनोख्या डिजीटल प्रचाराने महाराष्ट्रात त्यावेळी वेगळाच रंग आला होता. त्यावेळी विधानसभेची निवडणूक आपण लढणार असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतरही फार काळ मनसे निवडणूक लढणार की, नाही अशी स्थिती निर्माण झाली होती. अखेर मनसेने १०४ मतदारसंघात उमेदवार उभा केले. मात्र, लोकसभेप्रमाणे राज ठाकरे विधानसभेच्या प्रचारात तितके आक्रमक दिसले नाहीत.

हेही वाचा - राज्यात कोल्हापूर जिल्हा मतदानात आघाडीवर; जनता कोणाला बसवणार घरात?

निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंची कोहिनूर प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी झाली. चौकशीनंतर बराच काळ राज ठाकरे जाहीरपणे काहीच बोलले नाही. त्यामुळे चौकशीनंतर राज ठाकरे शांत झाल्याची टीका त्यांच्यावर झाली. गेल्या अनेक निवडणुकांपासून मनसे सातत्याने पिछाडीवर जात आहे. राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते. मात्र, त्यांना मते मिळत नसल्याचे वारंवार दिसून आले आहे. यंदाची निवडणूक ही मनसेसाठी अस्तित्वाची लढाई मानली जात आहे. मात्र, एक्सिट पोलमध्ये मनसे तळाला गेल्याचे दिसत आहे. गुरुवारी निकालातही असेच चित्र दिसल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे आणि मनसेचे काय होणार? असा प्रश्न निर्माण होत आहे.

Intro:Body:

राज ठाकरेंना मतदारांनी पुन्हा नाकारले? एक्सिट पोलमध्ये मनसे तळाला

निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंची कोहिनूर प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी झाली. चौकशीनंतर बराच काळ राज ठाकरे जाहीरपणे काहीच बोलले नाही. त्यामुळे चौकशीनंतर राज ठाकरे शांत झाल्याची टीका त्यांच्यावर झाली. गेल्या अनेक निवडणुकांपासून मनसे सातत्याने पिछाडीवर जात आहे. राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते. मात्र, त्यांना मते मिळत नसल्याचे वारंवार दिसून आले आहे. यंदाची निवडणूक ही मनसेसाठी अस्तित्वाची लढाई मानली जात आहे. मात्र, एक्सिट पोलमध्ये मनसे तळाला गेल्याचे दिसत आहे. गुरुवारी निकालातही असेच चित्र दिसल्यास राज ठाकरे आणि मनसेचे काय होणार? असा प्रश्न निर्माण होत आहे.   

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.