ETV Bharat / state

मतदान करा, 'मेंटेनन्स'मध्ये २०० रूपये सवलत मिळवा

बोरिवलीच्या धीरज एनकलेव्ह या गृहनिर्माण संस्थेनेही एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. मतदान करा आणि संस्थेच्या मेंटेनन्समध्ये २०० रुपये सवलत मिळवा, अशी त्यांची योजना आहे.

धीरज एनकलेव्ह सोसायटीतील सदस्य
author img

By

Published : Apr 28, 2019, 5:58 PM IST

मुंबई - राज्यात उद्या चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. हा लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी काही सामाजिक घटकही पुढे येऊन वेगवेगळे प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. बोरिवलीच्या धीरज एनकलेव्ह या गृहनिर्माण संस्थेनेही एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. मतदान करा आणि संस्थेच्या मेंटेनन्समध्ये २०० रुपये सवलत मिळवा, अशी त्यांची योजना आहे.

धीरज एनकलेव्ह सोसायटीतील सदस्य

आपल्या संस्थेच्या प्रत्येक सुजाण नागरिकाने मतदानासाठी घराबाहेर पडून आपली लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान करावे, ही यामागची भावना आहे. यासाठी धीरज गृहनिर्माण संस्थेने मतदान करण्यासाठी आमंत्रण पत्रिका देखील छापली आहे. आज रविवार सुट्टीचा वार असताना देखील संस्थेचे पदाधिकारी व लहान मुलांनी घरोघरी जाऊन मतदान करा, अशा आमंत्रण पत्रिका वाटल्या. तसेच मतदान करून पुढील महिन्यात मेंटेनन्समध्ये २०० रूपये सवलत मिळवा, असे आव्हान संस्थेच्या सदस्यांना केले. ए, बी, सी, डी अशा चार विंग मध्ये १५४ फ्लॅटधारक या इमारतीत निवासाला आहेत.

उद्या आम्ही संस्थेच्या सदस्यांना मतदान बूथपर्यंत ने आण करण्याची व्यवस्था देखील केली आहे. सदस्यांनी आपल्या आवडीच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी मतदानाचा हक्क बजवावा, असे धीरज एनकलेव्ह सोसायटीचे अध्यक्ष साहेबराव गायकवाड यांनी सांगितले. आमच्या संस्थेने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. आम्ही उद्या मतदानाचा हक्क १०० टक्के बजवणार असल्याचे संस्थेचे सदस्य आनंद रणदिवे यांनी सांगितले.

Intro:चौथ्या टप्प्यातील उद्या मतदान होणार आहे. हा लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी काही सामाजिक घटकही पुढे येऊन वेगवेगळे प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत.
असाच हा लोकशाहीचा उत्सव वेगळ्याप्रकारे साजरा करण्यात येणार आहे बोरिवलीच्या धीरज एनकलेव्ह या गृहनिर्माण संस्थेत. मतदान करा आणि संस्थेच्या मेंटेनन्समध्ये 200 रुपये सवलत मिळवा असा उपक्रम या संस्थेने हाती घेतला आहे.

Body:आपल्या संस्थेच्या प्रत्येक सुजाण नागरिकाने मतदानासाठी घरा बाहेर पडून आपली लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान करावे ही यामागची भावना आहे.
यासाठी धीरज गृहनिर्माण संस्थेने मतदान करण्यासाठी आमंत्रण पत्रिका देखील छापली आहे. आज रविवार सुट्टीचा वार असताना देखील संस्थेचे पदाधिकारी व लहान मुलं यांनी घरोघरी जाऊन मतदान करा अशा आमंत्रण पत्रिका वाटल्या आणि मतदान करून पुढील महिन्यात मेंटेनन्स मध्ये 200 रूपये सवलत मिळवा असे आव्हान संस्थेच्या सदस्यांना केले. ए, बी, सी, डी अशा चार विंग मध्ये 154 फ्लॅटधारक या इमारतीत निवासाला आहेत.

Conclusion:उद्या आम्ही संस्थेच्या सदस्यांना मतदान बूथपर्यंत ने आण करण्याची व्यवस्था देखील केली आहे. सदस्यांनी आपल्या आवडीच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी मतदानाचा हक्क बजवावा असे धीरज एनकलेव्ह सोसायटीचे अध्यक्ष साहेबराव गायकवाड यांनी सांगितले.

आमच्या संस्थेने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे आणि आम्ही उद्या मतदानाचा हक्क 100 टक्के बजवणार असल्याचे संस्थेचे सदस्य आनंद रणदिवे यांनी सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.