ETV Bharat / state

व्यवसायात वेगळेपणा असेल तरच यशस्वी व्हाल; उद्योजक कामत यांचा तरुणांना सल्ला

author img

By

Published : Dec 23, 2019, 9:46 AM IST

रघुनंदन कामत यांच्या नॅचरल आईस्क्रीमच्या जगभरात 140 शाखा आहेत. 1984 साली रघुनंदन एका कंपनीतून विभक्त झाले. तेव्हा त्यांनी स्वतःचे आईस्क्रीम पार्लर सुरू केले होते. आज ते यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जातात. तर,  इडली-सांबरपासून सुरू केलेला व्यवसाय विठ्ठल कामत यांनी आज फाईव्ह स्टार हॉटेलपर्यंत पोहोचवला आहे. या दोन यशस्वी उद्योजकांचा प्रवास तरुणांना कळावा या हेतूने सारस्वत चेंबर कडून हा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

udyog
संवाद कार्यक्रमात कामत हॉटेल्सचे संस्थापक विठ्ठल कामत आणि आणि नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन कामत

मुंबई - तरुणांनी व्यवसायात उतरले पाहिजे. परंतु, व्यवसायात काहीतरी वेगळेपण असले तरच व्यवसाय यशस्वी होऊ शकतो, असा मार्गदर्शनपर सल्ला कामत हॉटेल्सचे संस्थापक विठ्ठल कामत आणि आणि नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन कामत या प्रसिद्ध उद्योजकांनी दिला आहे. सारस्वत चेंबर तर्फे वडाळा येथील द्वारकानाथ भवनात या उद्योजकांसोबत संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

उद्योजकांचा तरुणांना सल्ला

रघुनंदन कामत यांच्या नॅचरल आईस्क्रीमच्या जगभरात 140 शाखा आहेत. 1984 साली रघुनंदन एका कंपनीतून विभक्त झाले. तेव्हा त्यांनी स्वतःचे आईस्क्रीम पार्लर सुरू केले होते. आज ते यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जातात. तर, इडली-सांबरपासून सुरू केलेला व्यवसाय विठ्ठल कामत यांनी आज फाईव्ह स्टार हॉटेलपर्यंत पोहोचवला आहे. त्यांचे हॉटेल्स जगभरात आहेत. व्यवसायांप्रमाणेच त्यांची भाषेवरसुद्धा पकड आहे. त्यांना 14 भाषा अवगत आहेत. अशा या दोन यशस्वी उद्योजकांचा प्रवास तरुणांना कळावा व त्यांचा आदर्श घेऊन तरुणांनी व्यवसाय सुरु करावा, या हेतूने सारस्वत चेंबर कडून हा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

हेही वाचा - 'व्हर्जिन'चे रिचर्ड ब्रॅन्सन उद्धव ठाकरेंच्या भेटीला, 'हायपरलूप'बाबत चर्चा

यावेळी, या उद्योजकांनी आपले अनुभव उपस्थितांसमोर मांडले. रघुनंदन कामत यांनी व्यवसायातील वेगळेपणामुळेच आपण यशस्वी होऊ शकलो, अशी भावना व्यक्त केली. याशिवाय, व्यवसायात दुरदृष्टी ठेऊन अपयशाला न घाबरता काम करण्याचा सल्ला विठ्ठल कामत यांनी यावेळी नवउद्योजकांना दिला.

Intro:मुंबई : तरुणांनी व्यवसायात उतरले पाहिजे. परंतु, व्यवसाय करताना हे लक्षात ठेवले पाहिजे की त्यात काहीतरी वेगळेपण असलेच पाहिजे; तरच व्यवसाय उत्तमरीत्या चालू शकतो, असा मार्गदर्शनपर सल्ला प्रसिद्ध उद्योजक विठ्ठल कामत आणि आणि नॅचरल आईस्क्रीम चे रघुनंदन कामत यांनी दिला.
Body:सारस्वत चेंबर तर्फे वडाळा, द्वारकानाथ भवन येथे कामत ग्रुप हॉटेलचे संस्थापक विठ्ठल कामत आणि नॅचरल आईस्क्रीम चे संस्थापक रघुनंदन कामत यांच्याशी संवाद असा कार्यक्रम झाला. यावेळी विठ्ठल कामत आणि रघुनंदन कामत यांनी एकत्रितपणे संवाद साधला.

रघुनंदन कामत यांच्या नॅचरल आईस्क्रीमचे जगभरात 140 शाखा आहेत. 1984 साली रघुनंदन एका कंपनीतून विभक्त झाले. स्वतःचे आईस्क्रीम पार्लर सुरू केले तेव्हापासून रघुनंदन यांनी पाठी वळून पाहिले नाही.

इडली सांबर पासून सुरू केलेला व्यवसाय आज विठ्ठल कामत यांनी फाईव्ह स्टार हॉटेल पर्यंत आणून ठेवला आहे. त्यांचे हॉटेल्स जगभरात आहेत. ज्याप्रकारे व्यवसायावरती त्यांची पकड आहे तशीच पकड भाषेवर सुद्धा आहे. त्यांना 14 भाषा अवगत आहे. अशा या दोन यशस्वी उद्योजकांचा प्रवास तरुणांना कळावा व त्यांचा आदर्श घेऊन तरुणांनी व्यवसाय सुरु करावा या हेतूने सारस्वत चेंबर कडून हा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता

मला एकाने एकदा आंबा दिला होता. त्यातूनच मला एक कल्पना सुचली. ती होती आईस्क्रीमची. तेव्हा पासून नॅचरल आईस्क्रीम तयार करायला सुरुवात झाली. आज आम्ही ज्या प्रमाणे आईस्क्रीम बनवतो तसे कोणी बनवत नाही. फणस, नारळ, जांभूळ यांपासूनही आईस्क्रीम बनवतो. यामुळे आमच्यात वेगळेपण काय आहे, हे समोरे येते. कोणताही व्यवसाय करताना अपयशाला घाबरले नाही पाहिजे. फक्त तरुणाने व्यवसायाला सुरुवात करताना त्याचा अभ्यास करावा करावा, असे रघुनंदन कामत यांनी सांगितले.

व्यवसायाची सुरुवात ही लहानधंद्यापासून करा, पहिला लोकल मग ग्लोबल हा विचार लक्षात ठेवा. जो मनुष्य व्यवसाय करतो त्याला दूरदृष्टी हवी. व्यवसाय करताना कोणता तरी गुरु शोधा. कर्ज घ्या या मात्र ते योग्य ठिकाणीच वापरा. परिस्थितीची चॅलेंज घेणे गरजेचे आहे. तुमच्या छंदाचा वापर हा व्यवसायात करा यश नक्कीच मिळेल असे डॉक्टर विठ्ठल कामत यांनी सांगितले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.