मुंबई - अभिव्यक्ती स्वातत्र्यांची गळचेपी झाली म्हणून मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, असे म्हणणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी फटकारले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण करताना यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य काँग्रेस कार्यकर्ते कुठे गेले होते,असा सवालही तावडेंनी केला. ते मुंबईत बोलत होते.
अभिव्यक्ती स्वातत्र्यांची गळचेपी झाली म्हणून मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, असे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी सांगितले होते. नंतर त्यांना उमेदवारीदेखील मिळवली. आज त्यांच्या प्रचारादरम्यान काही तरुणांनी 'मोदी, मोदी' अशी घोषणाबाजी केली. यावेळी उर्मिला यांच्यासोबत असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणा देणाऱ्या तरुणांसह एका तरुणीला मारहाण केली. जर तुम्ही अभिव्यक्ती स्वातत्र्यांची गप्पा मारता तर मग त्या तरुणांना त्यांचे काम करायला द्यायला हवे होते. यावेळी कुठे गेले तुमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य? असा सवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मातोंडकर यांना विचारला.
महत्वाचे म्हणजे, एका महिलेवर तुमचे काँग्रेसचे कार्यकर्ते हात उगारले आणि तुम्ही ते पाहत राहिलात, असेही तावडे म्हणाले. उर्मिला यांना जेवढी सुरक्षा द्यायची ती देऊ, त्यांना खासगी बॉडीगार्डदेखील देऊ. उर्मिलाजी ही सिनेमाची स्क्रिप्ट नाही. राजकारणात ऐकून घ्यावे लागते. उर्मिला मातोंडकर यांच्या समोर गोधळ करणारे कार्यकर्ते भाजपचे नव्हतेच. आमच्या भाजपा अध्यक्षांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे. असेही विनोद तावडे म्हणाले.