मुंबई - उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत हे ज्ञानेश्वरी विद्यापीठातून पदवीधारक आहेत. त्यावरून आता माजी मंत्री विनोद तावडे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. त्यावेळी ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीने माझ्यावर टीका केली होती, ते आज कुठे आहेत? असा सवाल तावडेंनी उपस्थित केला आहे. माझ्या गरिबीची थट्टा करू नका असे, मी त्यावेळेस सांगत होतो, मात्र आज उदय सामंत हे सलग दुसरे शिक्षण मंत्री त्याच ज्ञानेश्वरी विध्यापीठातून पास झालेत याचा अभिमान आहे. तसेच त्यांना माझ्या शुभेच्छा असल्याचेही तावडे म्हणाले. यावेळी तावडे यांनी इतर काही मुद्यावरही आपले मत व्यक्त केले.
जेएनयू हल्ला प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे
जवाहरलाल विद्यापीठात झालेल्या हिसाचारावर बोलताना तावडे म्हणाले, ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्काचे आंदोलन केले जेकी 10 रुपयांचे शुल्क 600 रुपये केली तर राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढत होते. त्या विद्यार्थ्याचे साबरमती होस्टेलच्या बाजूच्या टपरीत 10 हजारांचे चहाचे बिल होते. त्याचे 3 हजार सिगारेटचे बिल होते. अशा लोकांनी या प्रतिष्ठित विद्यापीठाचा तमाशा केला असल्याचा आरोपही तावडे यांनी यावेळी केला. या हल्ला प्रकरणाची चौकशी करून खरे दोषी कोण आहेत, ते समोर आणले पाहिजे असेही तावडे म्हणाले.