ETV Bharat / state

विनोद तावडेंनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन घेतली भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना युतीत घेण्यासाठी भाजपकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी आज भाजपचे दूत बनून शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मागील काही दिवसांत ठाकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेससोबत बरीच जवळीक वाढली आहे. त्यामुळे तावडे यांनी ही भेट घेतली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

विनोद तावडे
author img

By

Published : Feb 16, 2019, 3:49 PM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना युतीत घेण्यासाठी भाजपकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी आज भाजपचे दूत बनून शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

तावडे यांची ही भेट एक सदिच्छा भेट असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, ठाकरे यांना जवळ करता येईल काय अथवा राष्ट्रवादी काँग्रेसपासून ठाकरे यांना थोडे दूर ठेवण्यासाठी भाजपकडून हा एक प्रयत्न असावा, असेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यापूर्वी तावडे शिवाजी पार्क येथील जागतिक मल्लखांब स्पर्धेचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. यानंतर तावडे यांनी थेट ठाकरे यांचे निवासस्थान गाठले. तावडे यांची ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या भेटीतून भाजप ठाकरे यांना गोंजारण्याचा प्रयत्न करत आहे, असे बोलले जात आहे.

मागील काही दिवसांत ठाकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेससोबत बरीच जवळीक वाढली आहे. २ दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर ठाकरे यांना आघाडीत आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेतल्याने भाजपला धक्का बसला आहे. यामुळेच आज भाजपकडून तावडे यांना दूत म्हणून पाठवून त्यासाठीचा एक अंदाज घेण्यात आला असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

undefined

Intro:भाजपकडून राज ठाकरेंना गोंजारण्याचा प्रयत्न, चहाच्या निमित्ताने तावडेंनी घेतली भेटBody:भाजपकडून राज ठाकरेंना गोंजारण्याचा प्रयत्न, चहाच्या निमित्ताने तावडेंनी घेतली भेट
(डेस्कवर व्हिडीओ पाठवला आहे)
मुंबई, ता. 16 :

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना युतीत घेण्यासाठी भाजपाकडून हालचाली सुरू झाल्या असून त्यासाठी आज भाजपाचे दूत बनून शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तावडे यांची ही भेट एक सदिच्छा भेट असल्याचा दावा करण्यात आला असला तरी ठाकरे यांना जवळ करता येईल काय अथवा राष्ट्रवादी काँग्रेसपासून ठाकरे यांना थोडे दूर ठेवण्यासाठी भाजपाकडून हा एक प्रयत्न असावा असेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज सकाळी
दहाच्या सुमारास राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली
त्यापूर्वी तावडे हे शिवाजी पार्क येथील जागतिक मल्लखांब स्पर्धेचे उदघाटन करण्यासाठी आले होते. त्यानंतर तावडे यांनी थेट राज ठाकरे यांचे निवासस्थान घाठले असल्याचे सांगण्यात आले.
तावडे यांची ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात असलं तरी या भेटीतुन भाजपाने राज ठाकरे यांना गोंजारण्याचा पहिला प्रयत्न सुरू केला असल्याचे बोलले जात आहे.
मागील काही दिवसांत ठाकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेससोबत बरीच जवळीक झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर ठाकरे यांना आघाडीत आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेतल्याने भाजपाला याचा धसका लागण्याने आज भाजपाकडून तावडे यांना दूत म्हणून पाठवून त्यासाठीचा एक अंदाज घेण्यात आला असल्याचेही सूत्राकडून सांगण्यात आले.
ठाकरे- तावडे यांची ही भेट 10 मिनिटांसाठी झाली. यात तावडे यांनी आपण चहा घेण्यासाठी गेल्याचे सांगितले.
Conclusion:भाजपकडून राज ठाकरेंना गोंजारण्याचा प्रयत्न, चहाच्या निमित्ताने तावडेंनी घेतली भेट
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.