ETV Bharat / state

Protest Against MLA Rajan Salvi : बारसू प्रकल्पाला समर्थ दिल्याने ग्रामस्थ संतप्त, आमदार साळवींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला घातला चपलांचा हार - Barsu refinery project

बारसू रिफायनरी प्रकल्पाला समर्थन करणाऱ्या आमदार राजन साळवी यांच्या (Protest Against MLA Rajan Salvi) विरोधात बारसु- सोलगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी तीव्र निषेध (Villagers of Barsu Solgaon Panchkroshi protest) नोंदवला. दरम्यान, साळवींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चप्पलांचा हार घालून, चप्पल मारत, शेण फासत रिफायनरीला विरोध दर्शवला.

Protest Against MLA Rajan Salvi
आमदार राजन साळवी यांचा निषेध
author img

By

Published : Nov 25, 2022, 9:46 AM IST

मुंबई : बारसू रिफायनरी प्रकल्पाला समर्थन करणाऱ्या आमदार राजन साळवी यांच्या (Protest Against MLA Rajan Salvi) विरोधात बारसु- सोलगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी तीव्र निषेध (Villagers of Barsu Solgaon Panchkroshi protest) नोंदवला. दरम्यान, साळवींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चप्पलांचा हार घालून, चप्पल मारत, शेण फासत रिफायनरीला विरोध दर्शवला. एकच जिद्द, रिफायनरी रद्द आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या.

स्थानिक चांगलेच संतप्त : बारसू - गोवळ येथे रिफायनरी प्रकल्प उभारला जाणार आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक बोलावली होती. लांजा विधानसभा मतदार संघाचे आमदार साळवी या बैठकीला हजर होते. रिफायनरीबाबत बारसू पंचक्रोशीतील स्थानिकांचा विरोध मावळला असून त्यांनी समर्थन केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रिफायनरीबाबत स्थानिकांच्या बाजूने असल्याची भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. बारसु - सोलगाव पंचक्रोशीतील शिवणे खु., गोवळ व देवाचे गोठणे मधील स्थानिकांनी पाठिंबा असल्याने समर्थन दिल्याचे साळवी यांनी म्हटले होते. मात्र, या विरोधात आता स्थानिक चांगलेच संतप्त झाले (supported Barsu refinery project) आहेत.

आमदार राजन साळवी यांच्या विरोधात बारसु- सोलगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा तीव्र निषेध

विनाशकारी प्रकल्प स्थानिकांच्या माथी : साळवी यांनी स्थानिक ग्रामस्थांचे समर्थन आहे. हे धडधडीत खोटे बोलून, जनतेच्या रिफायनरी कंपनीकडे कुठल्याही मागण्या नसताना जनतेच्या मागण्या म्हणून भिका मागणारे निवेदन दिले आहे. स्वतःच्या आर्थिक मालिद्यासाठी रिफायनरी कंपनीसोबत सेटलमेंट करून विनाशकारी प्रकल्प स्थानिकांच्या माथी मारत आहेत. गेली तीन टर्म आमदार होऊनही त्यांना विकास कामे करता आली नाहीत. स्वतःचा नाकर्तेपणा लपविण्यासाठी सगळा हा खटाटोप आहे, असा स्थानिकांचा आरोप आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पुतळ्याला चपलांचे हार घालून, तोंडावर शेण फासून निषेध नोंदवला. महिलांचा मोठ्या प्रमाणावर यात सहभाग होता. बारसु- सोलगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा वाढत्या असंतोषाची शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची नोंद घेतील, अशी अपेक्षा (Barsu refinery project) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.