मुंबई : भारतीय कृषी संस्कृतीचा महत्वाचा घटक असलेल्या तृणधान्याला जागतिक स्तरावर आता विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. संयुक्तराष्ट्र संघाने २०२३ हे वर्ष जागतिक तृणाधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. भारताने संयुक्तराष्ट्र संघात यासंबंधीचा प्रस्ताव मांडला होता. पिकांना तृणधान्य म्हणून प्राधान्य मिळाले की, जागतिक स्तरावर यासंबंधीची जागृती अधिक वाढणार आहे. तृणधान्याच्या पिकांकडे अधिक लक्ष वाढावे म्हणून भारतानेही २०१८ हे वर्ष राष्ट्रीय तृणधान्य वर्षे म्हणून साजरी केले होते. आता पुन्हा यावर्षी उत्साहाने साजरे करण्याची गरज शासनास लक्षात आली आहे.
गावठी तृणधान्याच्या चळवळीला वेग : अन्नधान्य सुरक्षा कायद्यामध्ये तृणधान्याचा समावेश करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत तृणधान्यही देण्यात येतील. मात्र सर्व राज्यांत ते सक्रियपणे लागू केलेले नाही. पोषक तृणधान्ये हा शब्द अधिकृतपणे रासवट (गावठी) तृणधान्ये म्हणून भारतात वापरला जात आहे. आता आंतरराष्ट्रीय वर्ष घोषित केल्याने पुन्हा एकदा गावठी तृणधान्याच्या चळवळीला वेग येणार आहे. अर्थात शासन किती परीणामकारक अभियान राबवते ते येत्या काळात समजेलच.
धान्याचे पौष्टिक फायदे : देशात नाचणी, ज्वारी आणि बाजरी ही तृणधान्यांची प्रमुख उत्पादन होते. धान्याच्या प्रकारानुसार धान्याचे पौष्टिक फायदे ठरतात. उच्च कॅल्शिअम, लोह आणि प्रथिने ते कमी ग्लायसेमिक इंडेक्स, मुख्य आहाराच्या तुलनेत जास्त फायबर देणारे धान्य आहेत. धान्याच्या पिकांची वाढ कोरडवाहू जमिनीसह पर्जन्यवृष्टी असलेल्या परिस्थितीतही होते. अगदी निकृष्ट दर्जाच्या मातीतही तृणधान्याचे पीक घेता येते.
जलसिंचन सुविधा आणि खतांचा वापर : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या मते, विशेषत अधिक उत्पन्न देणाऱ्या १८ धान्याचे वाण मागील वर्षात देशाच्या विविध भागात वाटण्यात आले होते. कर्नाटकसह देशातील सर्वाधिक तृणधान्य उत्पादक राज्यांमध्ये महाराष्ट्राचे स्थान वरचे आहे. त्यानंतर राजस्थान, तामिळनाडू आणि इतर राज्यांचा समावेश होतो. महाराष्ट्रामध्ये तर जलसिंचन सुविधा आणि खतांचा वापर करत प्रगतशील शेती करण्यात येते.
पारंपरिक पद्धतीमध्ये बदल : वैज्ञानिकांच्या संशोधनात असे दिसून आले आहे की, तृणधान्याला आता शहरी ग्राहकांमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. मात्र बहुतेक शेतकरी अजूनही त्यांना नगदी पीक मानत नाही. ते तांदूळ आणि गहू यासारख्या पिकांना प्राधान्य देतात. शास्त्रज्ञांनी प्रयोगासह दाखवून दिले आहे की, तृणधान्याचे योग्य उत्पादन घेतले तर आपण त्यातून ७१ टक्क्यांपर्यंत आर्थिक उत्पन्न वाढवू शकतो. त्यासाठी पारंपरिक पद्धतीमध्ये बदल करत आधुनिक लागवडीवर अधिक भर दिला तर तृणधान्यातूनही अधिक उत्पादन मिळेल.
हेही वाचा: Bhopal Trilok Bor 100 वर्षे जुने दुर्मिळ बोरांचे झाड बोरांची किंमत ऐकून व्हाल थक्क