मुंबई - विक्रोळी पार्कसाईट पोलीस ठाण्यात रविवारी राज्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे हे पाहणी दौरा करणार होते. याची माहिती मिळताच पार्कसाईट पोलिसांची एकच गडबड उडाली होती. यावेळी, पोलीस ठाण्याच्या आवारात कारवाई करून आणलेल्या गाड्यांचा ढीग व कचरा साफ करण्याचे काम स्वतः पोलीस अधिकारी करू लागले.
देशात स्वच्छ भारत अभियानातंर्गत प्रशासनाला नेहमीच आपले विभाग स्वच्छ ठेवा अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी देत असतात. त्याकरिता स्वच्छ भारत अभियान मोहीम देशात वारंवार राबवली जाते. मात्र, प्रशासकीय अधिकारी फक्त या स्वच्छता अभियानांचा देखावाच करतात की काय, असा प्रश्न निर्माण होतो आहे.
हेही वाचा - '...तर शिवसेनेने काँग्रेसच्या पाठिंब्यावरील सरकार बरखास्त करावे'
विक्रोळी पार्कसाईट पोलीस ठाण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा वाहतूक कोंडी आणि अस्वच्छतेने विळखा घातला आहे. मात्र, यावेळी साफ सफाई होत असताना पाहून नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला, परंतु तो क्षणभंगुरच ठरला. कारण मंत्रमहोदयांचा दौरा रद्द झाला, ते येणार नाहीत असे कळताच ही स्वच्छता मोहीम थांबवण्यात आली.
हेही वाचा - राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्याविरोधात मानहानीचा दावा ठोकणार - रणजित सावरकर