मुंबई Winter Session 2023 : आज विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची विधिमंडळात बैठक पार पडली. या बैठकीला तीनही पक्षांचे नेते, मित्रपक्षांचे नेतेही उपस्थित होते. नागपूर येथील अधिवेशनाचा कालावधी कमी आहे. सरकारनं कालावधी वाढवून दिला पाहिजे. बैठकीत राज्यातील जनतेला भेडसावीत असलेल्या महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाली. सर्व विषय धरुन पुढं कसे न्यायचे यावर चर्चा सविस्तर झाली. सध्या शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळ, महागाई, बेरोजगारी हे प्रश्न गंभीर आहेत. त्याचबरोबर भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. सगळ्या प्रश्नना घेऊन आम्ही सरकारला जाब विचारणार असल्याचं विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) म्हणाले. 6 तारखेला पुढील बैठक होणार आहे. महाराष्ट्राला ड्रग्जचा विळखा पडला आहे. तरुण पिढी वाया जात आहे. सरकार आज फक्त आरक्षण आणि एकमेकांवर बोलत असून मूलभूत विषयांना बगल देण्याचं काम सरकारकडून सुरु आहे. तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान यार चारही राज्यात 100 टक्के काँग्रेस विजयी होईल, असा आम्हांला विश्वास असल्याचं वडेट्टीवार म्हणाले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात अस्वस्थता : नागपूर इथं 7 तारखेला अधिवेशन सुरुवात होत आहे. राज्यपुढं जनतेचे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांना सोडवण्याच्या उद्देशानं सरकार मात्र समोरं जात नसल्याचा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अस्वस्थता आहे, शासनाकडून काहीच होत नाही. अवकाळी पावसामुळं मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान झालं आहे. बेरोजगारी वाढलीय, प्रगती थांबली, सरकार काहीच करत नाही. देशात इंडिया आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहे. इंडिया आघाडीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ. महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढू असं विश्वास थोरात यांनी व्यक्त केला. आत आता महाविकास आघाडीत अजित पवार नाहीत. विजयी होण्याची क्षमता महाविकास आघाडीत आहे. पाचही राज्याच्या निवडणूक निकालात काँग्रेसचं विजयी होईल, असा ठाम विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.
प्रफुल पटेलांवर विश्वास नाही : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून दोन गट निर्माण झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार गट आणि अजित पवार गट निर्माण झाले. दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. नेमके खरं कोण बोलतंय असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत आहे. यावर बोलताना शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, विचारुन होत नाही, प्रमोद महाजन हे वरती, बाळासाहेब ठाकरे हे वरती, गोपिनाथ मुंडे हे देखील वरती, मग कोणाला विचारायचं? प्रफुल पटेल यांच्यावर विश्वास नाही राहिला. जो माणूस हारतो तरी त्याला मंत्री केलं जातं. तो आज असं वागतो त्याच्यावर काय विश्वास ठेवायचा? असा दावा आव्हाड यांनी केला आहे. शिवसेना पक्षात बंडखोरी केली तेंव्हा जे अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना सल्ला दिला होता, तोच त्यांनी स्वतःवर लागू करावा. 'लोका सांगे ब्रम्हा ज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण' हे नको ना, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे.
यांची होती उपस्थिती : बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, शिवसेना नेते अनिल परब, सुनील प्रभू, अजय चौधरी, अमीन पटेल, जनता दल युनायटेडचे नेते कपिल पाटील, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी आदी नेते उपस्थित होते.
हेही वाचा -
- Winter Session 2022 : हिवाळी अधिवेशनात बारा विधेयके मंजूर; दहा दिवसांमध्ये ८४ तास कामकाज
- NCP Accuses Governor : महाविकास आघाडीला राज्यपालांकडून सातत्याने दडपण्याचा प्रयत्न; राष्ट्रवादीचा राज्यपालांवर आरोप
- MH Assembly Winter Session 2021 : अध्यक्षांची निवडणूक अर्थसंकल्पीय अधिवेशनात? वाचा, आज विधानसभेत काय घडले?