मुंबई - माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची लोकप्रिय ठरलेली 33 कोटी वृक्षांची योजनेतील 33 कोटी वृक्षापैकी निम्मी झाडेदेखील आता जिवंत नाहीत. याबाबत अनेक लोकप्रतिनिधींनी माझ्याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे सॅटेलाइटच्या माध्यमातून सर्वेक्षण करून वस्तुस्थिती समोर येणे गरजेचे आहे, अशी मागणी विशेष मागास प्रवर्ग कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
वडेट्टीवार पुढे म्हणाले, की 33 कोटी वृक्ष लागवडीमध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून नव्हे, तर लोकप्रतिनिधींनी मागणी केली. म्हणून याची चौकशी होणे, गरजेचे आहे. यामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप केले नाहीत. मात्र, वस्तुस्थिती समोर येणे गरजेचे आहे.