ETV Bharat / state

वरवरा राव यांना दिलासा नाहीच, मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी विभागीय बेंचकडे अर्ज करा, हायकोर्टाचे निर्देश

author img

By

Published : Jun 5, 2023, 1:48 PM IST

ज्येष्ठ कवी वरवरा राव यांना दिलासा मिळालेला नाही. मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी विभागीय बेंचकडे अर्ज करावा असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. वरवरा राव यांनी हैदराबादला वैद्यकीय कारणास्तव जाण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

वरवरा राव
वरवरा राव

मुंबई - तेलंगणामधील तेलुगु भाषिक ज्येष्ठ कवी आणि भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी आरोप असलेले वरवरा राव यांना मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी हैदराबाद येथे जायला परवानगी मिळावी, अशी विनंती त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात केलेली होती. मात्र आज झालेल्या सुनावणीमध्ये एनआयएनने त्याला विरोध केला. न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी हा अर्ज नाकारत खंडपीठाकडे पुन्हा अर्ज करण्यासाठीचे निर्देश दिले.

भीमा कोरेगाव या ठिकाणी 200 वर्ष पूर्ण होत असतानाच्या मोठ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी हिंसाचार झाला. त्या हिंसाचाराला कारणीभूत ज्येष्ठ कवी वरवरा राव असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे. त्यांना राष्ट्रीय तपास संस्थेने अटक देखील केली होती. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय कारणासाठी न्यायालयात अर्ज केला व त्यांना अनेक दिवस सरकारी दवाखान्यात कोरोना महामारीच्या काळात दाखल करण्यात आले होते. सध्या ते जामिनावर आहेत. मोतीबिंदू शस्त्रक्रिया त्यांच्या नेहमीच्या डॉक्टरकडे करावी असा त्यांचा अर्ज होता. मात्र न्यायालयाने म्हटले आहे की, आपण ह्यावर निर्णय करू शकत नाही. त्यासाठी खंडपीठाकडे पुन्हा अर्ज करावा लागेल. कारण त्याला एकल खंडपीठ पुरेसे नाही.

तसेच वरवरा राव यांच्या वकिलांनी मूळ जामीन अर्जामध्ये सुधारणा देखील करण्याची विनंती केली आहे. ती देखील मागणी त्यांनी या वेळेला सुनावणीमध्ये केली होती. मात्र न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी ती मागणी फेटाळली आणि खंडपीठाकडे जाण्याचे निर्देश दिले. आता पुन्हा नव्याने खंडपीठाकडे वरवरा राव यांना अर्ज करावा लागणार आहे.

वरवरा राव यांच्या वकिलांनी न्यायालयामध्ये सांगितले की, 'त्यांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी हैदराबाद येथे त्यांना आरोग्य उपचार घेण्यासाठी इस्पितळात जायला हवं' यावर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी म्हटलं की, जर वस्तुस्थिती तशीच असेल तर ठीक आहे. परंतु वस्तुस्थिती वेगळी असेल तर मग मात्र या खटल्याचा रंग बदलू शकतो .म्हणून याबाबत निर्णय करण्यासाठी द्विसदस्य खंडपीठाकडेच जावे लागेल.

मात्र राव यांचे वकील सत्यनारायण यांनी म्हटले की, मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या संदर्भात तेलंगणा राज्याचे जे काही नियम आहेत, त्यासाठी जी प्रक्रिया आहे त्याबाबतचे सर्व दस्ताऐवज कागदपत्रे याचिकेमध्ये जोडलेले आहेत. त्याचे न्यायालयाने अवलोकन करावे. न्यायालयाने हे अवलोकन केल्यानंतर आज कोणताही दिलासा देता येणार नाही असे म्हटले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.