ETV Bharat / state

आता घरबसल्या मिळणार गौरी पूजनाचे साहित्य; लालबागमधील विक्रेत्यांची ऑनलाइन सेवा - mumbai lalbag market news

श्रद्धा आर्टस् नावाच्या या वेबसाईटवर ग्राहकांना मूर्ती, गौरीचे मुखवटे आणि गौरी नटविण्यासाठी लागणारे इतर साहित्य, गौरी पूजनासाठी आवश्यक साहित्य, मूर्ती वेबसाईटवर मिळणार आहे. मुखवट्यांची किंमत १ हजार ते १४०० पर्यंत आहेत. तर पूर्ण तयार मूर्तीची किंमत ११ ते १५ हजारांच्या घरात आहे. याशिवाय इतर लागणारे साहित्य देखील उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

Vendors in Lalbaug started online business
आता घरबसल्या मिळणार गौरी पूजनाचे साहित्य; लालबागमधील विक्रेत्यांनी सुरू केला ऑनलाईन व्यवसाय
author img

By

Published : Jul 28, 2020, 4:51 PM IST

मुंबई - गणेशोत्सव म्हटला की मुंबईकरांच्या डोळ्यासमोर येतो तो लालबाग मार्केट. मात्र, सध्या कोरोनामुळे उत्सवाच्या खरेदीवर मंदीचे सावट आहे. यावर लालबाग येथील व्यापाऱ्यांनी एकत्र येत एक ऑनलाईन वेबसाइट सुरू करत त्यांनी गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य लोकांना घरपोच मिळेल, अशी व्यवस्था केली आहे. यामुळे आता भाविकांना घरबसल्या साहित्य घेणे सोपे जाणार आहे.

घरगुती गणेशोत्सवासाच्या खरेदीसाठी हक्काची बाजारपेठ म्हणून लालबाग मार्केटला नागरिकांची पंसती असते. गणेशोत्सव, गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य खरेदी करतात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे उत्सवाच्या खरेदीवर मंदीचे सावट घोंगावत आहे. त्यामुळे लालबाग येथील व्यापाऱ्यांनी एकत्र येत साहित्य विक्रीसाठी श्रद्धा आर्टस् नावाची ऑनलाईन वेबसाइट सुरु केली आहे. लोकांना घरच्या पुजेचे साहित्य मिळावे हा या वेबसाईटचा हेतू आहे. लालबाग मार्केटमध्ये गौरींच्या मुखवट्यांपासून साडी, दागिने आणि इतर साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते. मात्र यावर्षी गर्दी टाळता यावी, नियमांचे पालन व्हावे, यासाठी ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे. गौरींचे मुखवटे, इतर साहित्य आणि पूर्ण गौरींची मूर्ती ऑनलाइन विक्री होणार आहेत. गौरींच्या मूर्ती आणि साहित्यांची विक्री अशाप्रकारे करण्याचा हा जवळपास पहिलाच प्रयोग असल्याचा दावा या निमित्ताने केला जात आहे.

https://arts.shraddhacollection.com असे या वेबसाईटचे नाव आहे. या वेबसाईटवर ग्राहकांना मूर्ती, गौरीचे मुखवटे आणि गौरी नटविण्यासाठी लागणारे इतर साहित्य, गौरी पूजनासाठी आवश्यक साहित्य, मूर्ती वेबसाईटवर मिळणार आहे. मुखवट्यांची किंमत १ हजार ते १४०० पर्यंत आहेत. तर पूर्ण तयार मूर्तीची किंमत ११ ते १५ हजारांच्या घरात आहे. याशिवाय इतर लागणारे साहित्य देखील उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. विक्रेत्यांच्या या निर्णयामुळे दरवर्षी दुकानांमध्ये होणारी गर्दीला यंदा पूर्णविराम लागणार आहे. यामुळे सोशल डिस्टन्ससिंगचेही सहजपणे पालन करता येणार आहे. असे लालबाग येथील गौरीच्या मूर्तीचे विक्रते स्वप्निल कसाबे यांनी सांगितले.

हेही वाचा - प्रतिदिन साडेचार हजारांच्या पुढे रुग्णालयाला खर्च आकारता येणार नाही - आरोग्यमंत्री

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.