ETV Bharat / state

दादर स्थानकाचं नाव चैत्यभूमी करावं - वर्षा गायकवाड - दादर स्थानकाचं नाव चैत्यभूमी करावं

Mahaparinirvan Din 2023: राज्य सरकारनं एल्फिन्स्टन रोड स्थानकाचं नाव प्रभादेवी करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. मग त्याच धर्तीवर कोट्यवधी भीम अनुयायांची मागणी असूनही दादर स्थानकाचं नामांतर ‘चैत्यभूमी’ असं करावं, अशी मागणी मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी सरकारकडे केली.

Varsha Gaikwad News
वर्षा गायकवाड
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 6, 2023, 7:10 PM IST

प्रतिक्रिया देताना वर्षा गायकवाड

मुंबई Mahaparinirvan Din 2023 : आज महामानवाचा 67 वा महापरिनिर्वाण दिन आहे. चैत्यभूमिवर भीमसागर उसळला आहे, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय नेत्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. तसंच देशाच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी आज मुंबईत आले आहेत. महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने वर्षा गायकवाड यांनी देखील चैत्यभूमी येथे महामानवाला अभिवादन केलं. या दिवसाचं औचित्य साधून त्यांनी कोट्यवधी भीम अनुयायांच्या मनातील मागणी (Varsha Gaikwad Demand) बोलून दाखवली.

दादरला अनन्यसाधारण महत्व : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या आयुष्यात दादरला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दादरलाच राजगृह येथे ते राहायचे आणि महापरिनिर्वाणानंतर त्यांचा अंत्यविधी येथेच झाला. त्यामुळं राज्यातल्याच नाही, तर देशातल्या आणि जगातल्या भीम अनुयायांच्या भावना दादरशी जोडल्या गेल्या आहेत. दरवर्षी लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर येतात. त्यामुळं त्यांच्या भावनांचा आदर करत या अधिवेशनातच राज्य सरकारने असा प्रस्ताव मंजूर करावा आशी मागणी गायकवाड यांनी सरकारकडे केली आहे.

प्रभादेवी झालं, मग चैत्यभूमी का नाही : 2018 मध्ये राज्य सरकारने एल्फिन्स्टन रोड स्थानकाचं (Elphinstone Road Station) नाव बदलून प्रभादेवी केलं. ओशिवारा येथे रेल्वे स्थानक बनत असतानाच त्याला राम मंदिर असं नाव दिलं. दादर स्थानकाचं (Dadar Railway Station) नाव बदलून चैत्यभूमी करावं, ही भीमसैनिकांची मागणी खूप जुनी आहे. त्यामुळं राज्य सरकारने जनभावनेचा आदर करत आता दादरचं नाव चैत्यभूमी (Chaityabhoomi) करावं, अशी आग्रही मागणी गायकवाड यांनी केलीय. याचवेळी प्रभादेवी झालं, मग चैत्यभूमी का नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

दादर चैत्यभूमीवर मोठ्या प्रमाणात अनुयायी दाखल : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी येथे आंबेडकरी अनुयायी हे मोठ्या प्रमाणात दाखल होत असतात. नागरिकांच्या सोयीसुविधेसाठी महानगरपालिकेचे कर्मचारी देखील तैनात करण्यात आले होते. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.

हे वाचलंत का -

  1. राज्यासाठी लाजिरवाणी बातमी, रेल्वेतील गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल!
  2. 'या' वास्तूत भजी, सोडा आणि जमायची गप्पांची मैफल, वाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची साहित्यिक आठवण
  3. बेहिशेबी मालमत्ता प्रकरण, शिक्षण विभागातील 3 तत्कालीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.