ETV Bharat / state

Varsha Gaikwad : कोट्यवधी रुपये खर्च करून सुद्धा मुंबईची तुंबई का - वर्षा गायकवाड यांचा सवाल - Varsha Gaikwad

महापालिकेने खर्च केलेल्या कोट्यवधी रुपयाचा निधी गेला कुठे? यामध्ये घोटाळा आणि भ्रष्टाचार झाला असून याची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी, मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केली आहे. आषाढी एकादशी निमित्ताने मुंबईमधील वडाळा येथील प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्या बोलत होत्या.

Varsha Gaikwad
वर्षा गायकवाड
author img

By

Published : Jun 29, 2023, 11:02 PM IST

माहिती देताना वर्षा गायकवाड

मुंबई : शहरात गेल्या काही दिवसापासून पाऊस सुरू आहे. मुंबई महापालिका आणि शिंदे सरकारकडून शंभर टक्के नालेसफाई, खड्डे मुक्त रस्ते आणि सर्वात महत्त्वाचे मुंबई शहर आणि उपनगर पावसाच्या पाण्याने तुंबणार नसल्याचा दावा केला होता. पहिल्या पावसात मुंबई शहर आणि उपनगर तुंबल्याने मुख्यमंत्री आणि महापालिकेने केलेला दावा फोल ठरला आहे. ढिल्या आणि भ्रष्ट कारभारामुळेच करदात्या मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

प्रचंड वाहतूक कोंडी : अंधेरी सबवे तर जलमय झाल्याने संपूर्णतः बंद करण्यात आला होता. त्यामुळे त्या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने, मुंबईकरांचे हाल झाले. मागाठाणे येथे भूसख्खलन झाले. अनेक ठिकाणी खड्डे पडल्याच्या, मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याच्या शेकडो तक्रारी येत आहेत. अवघ्या पाच दिवसांच्या पावसात वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये आठ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. रस्ते दुरुस्ती तसेच खड्डेमुक्तीसाठी या वर्षी १४४ कोटी आणि आणि नालेसफाईसाठी २५७ कोटी रुपये खर्च केल्याचा दावा, मुंबई महानगरपालिकेकडून केला जात आहे. पहिल्या दुसऱ्या पावसाने मुंबईकरांचे अत्यंत हाल झाले, मग मुंबई महानगरपालिकेने खर्च केलेले कोट्यवधी रुपये गेले कुठे ? हे पैसे त्यांनी कुणाच्या घशात घातले, यामध्ये घोटाळा आणि भ्रष्टाचार झाला आहे, त्याला जबाबदार कोण ? असा संतप्त सवाल वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.

दरवर्षी नालेसफाई : दरवर्षी मुंबई महानगरपालिकेकडून रस्त्यावरील खड्डेदुरुस्ती आणि नालेसफाईच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. मात्र महापालिका दरवर्षी दिलेलेले अश्वशन पूर्ण करीत नाही. मुंबई महानगरपालिकेच्या या भ्रष्ट आणि ढिल्या कारभारामुळेच जो प्रामाणिकपणे कर भरतो, अशा सर्वसामान्य मुंबईकर नागरिकाला हा मनस्ताप सहन करावा लागत आहे, असा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून सुद्धा मुंबईची तुंबई का होते?

मुख्यमंत्री कारवाई करणार का?: यावर्षी मुंबईत पाणी तुंबणार नाही. मुंबईची तुंबई होणार नाही. अशा प्रकारचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई महानगर पालिका आयुक्त यांनी दिले होते. जर मुंबईत पाणी साचले आणि मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागला तर जबाबदार पालिका अधिकाऱ्यांना नारळ देऊन घरी बसवू आणि कठोर कारवाई करण्यात येईल असे मुख्यमंत्री म्हणाले होते. मुख्यमंत्री कधी कारवाई करणार आणि भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश देणार की नाही असा, प्रश्र गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा-

  1. Mumbai Municipal Election : राज्यात काँग्रेसची मोर्चेबांधणी सुरु, मुंबई काँग्रेस अध्यक्ष बदलीचा निवडणुकीत होणार फायदा?
  2. Love shop Activity In Mumbia: मुंबईतील सर्व वार्डमध्ये 'मोहब्बतचे दुकान' उपक्रम सुरू करणार - वर्षा गायकवाड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.