ETV Bharat / state

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून 'वंदे भारत ट्रेन'चं जल्लोषात स्वागत; म्हणाले, मुंबई ते अयोध्या रेल्वे सुरू व्हावी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Vande Bharat Express Welcome Mumbai : आज जालना ते मुंबई वंदे भारत रेल्वेचे सीएसटी येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. (CM Eknath Shinde) आजपासून सुरू झालेली जालना-मुंबई ही वंदे भारत रेल्वे छत्रपती शिवाजी टर्मिनल स्थानकात आल्यानंतर या रेल्वेचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्थानकात उपस्थित होते. (Vande Bharat Arrival) यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुंबईहून अयोध्या अशी रेल्वे सुरू व्हावी अशी महाराष्ट्रातील नागरिकांची इच्छा आहे, यावेळी त्यांच्यासमवेत खासदार राहुल शेवाळे आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित देखील होते.

Vande Bharat Welcome
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 30, 2023, 10:04 PM IST

मुंबई Vande Bharat Express Welcome Mumbai : दरम्यान, राज्यात रेल्वेने १ लाख ७ हजार कोटींची कामं हाती घेतली आहेत. आज हे वर्ष संपत असताना राज्याला सातवी वंदे भारत ट्रेन मिळाली आहे, याचा आम्हा सगळ्यांना आनंद आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. (Ayodhya Dham Junction) यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. पंतप्रधानांनी एकदा ठरवलं की तो प्रकल्प किंवा कार्यक्रम टाईम बाउंड पद्धतीनं पूर्ण होतोच असेही मुख्यमंत्री म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांनी मुंबई ते अयोध्या रेल्वे देखील सुरू करण्याची विनंती रेल्वे मंत्रालयाला केली आणि उपस्थितांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला. (Vande Bharat Welcome)

प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद: या रेल्वेमुळे आता महाराष्ट्रात जालना ते मुंबई, मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते मडगाव, मुंबई सेन्ट्रल ते गांधीनगर, नागपूर ते इंदौर, नागपूर ते बिलासपूर अशा सात ट्रेन्स धावतील. जालना–मुंबई वंदे भारत ट्रेनचे आगमन झाले, तेव्हा मुख्यमंत्री भाषण करत होते. उतरलेल्या प्रवाशांचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत करताच या प्रवाशांनीसुद्धा टाळ्या वाजवून दाद दिली. त्यानंतर मुख्यमंत्री स्वतः ट्रेनमध्ये चढले आणि त्यांनी प्रवाशांना आणि उपस्थित विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प तसेच मिठाई दिली. या ट्रेनमधल्या सोयी आणि सुविधांविषयी प्रवाशांकडून जाणून घेतले. वंदे भारत ट्रेनला पहिल्याच दिवशी प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला.

जालन्यातून वंदे भारत ट्रेनचा शुभारंभ: आज 30 डिसेंबर 2023 रोजी जालना रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक्सप्रेस या आधुनिक रेल्वेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. लोकांच्या मनात राम बसला आहे. तो तुम्ही काढूच शकत नाही असं ते यावेळी म्हणाले.

रेल्वे विभागाकडून गतीने काम: यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, रेल्वे विभागाने 2014 ते 2023 पर्यंत अत्यंत गतीने प्रगती केली आहे आणि सर्व देशभरात रेल्वे लाईन मोठ्या प्रगतीपथावर आपले काम करत असल्याचं मत यावेळी दानवे यांनी व्यक्त केलं. तसंच येणाऱ्या 2024 मध्ये नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान होणार असून पुन्हा मोठ्या जोमाने ते काम करणार आहेत. देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात रेल्वेचे जाळे पसरवणार असल्याचं मत दानवे यांनी व्यक्त केलं. तसंच यापूर्वीच्या सरकारमध्ये महाराष्ट्राला फक्त 1600 कोटी रुपये मिळत होते. मात्र मोदी सरकारमध्ये बारा हजार कोटी रुपयांचे बजेट या रेल्वे विभागाला मिळाले आहे. तसंच 2024 पर्यंत देशातील प्रत्येक भागात रेल्वे लाईनचे विद्युतीकरण होणार असल्याची माहितीसुद्धा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी दिली आहे.

यामुळे मराठवाड्याच्या विकासाला चालना: भविष्यामध्ये जालना आणि छत्रपती संभाजी नगर हे इंडस्ट्रियल मॅग्नेट म्हणून तयार होत आहेत आणि ही दोन्ही शहरे भारताची आर्थिक राजधानी मुंबईशी जोडली जात असल्यामुळे मराठवाड्याच्या विकासाला गती मिळणार आहे. तसंच वंदे भारत ही रेल्वे लातूर येथील कोच फॅक्टरीमध्ये बनवण्यात येणार आहे. त्यामुळे निश्चितच मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळणार असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

हेही वाचा:

  1. देवेंद्र फडणवीसांच्या वजनानं बाबरी पडली असावी; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
  2. "कृषीप्रधान भारताला कृषीमंत्रीच नाही", शरद पवारांचा शेतकरी आक्रोश मोर्चात हल्लाबोल
  3. 'वंदे भारत ट्रेन'मुळं पर्यटन, उद्योग व्यवसायाला मिळेल चालना; उद्योजकांनी व्यक्त केला विश्वास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.