ETV Bharat / state

मुंबईत वंचित आघाडीच्या बंदला संमिश्र प्रतिसाद; उपनगरात बसवर दगडफेक - वंचित बहुजन आघाडी मुंबई आंदोलन

उपनगरात काही ठिकाणी दुकानं बंद करण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला. काही ठिकाणी रास्तारोकोही करण्यात आला. त्यावेळी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

vanchit bahujan aghadi protest
मुंबईत वंचित आघाडीच्या बंदला संमिश्र प्रतिसाद
author img

By

Published : Jan 24, 2020, 12:03 PM IST

Updated : Jan 24, 2020, 12:11 PM IST

मुंबई - सुधारित नागरिकत्व कायदा आणि नवरत्न कंपन्या विकण्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने आज (शुक्रवार) बंद पुकारला आहे. या बंदचा परिणाम मुंबईत काही ठिकाणी जाणवू लागला आहे. वंचितची ताकद असलेल्या विक्रोळी, मुलुंड, वरळी, चेंबूर याठिकाणी व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली आहेत.

वंचितच्या बंदचा प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी घेतलेला आढावा

उपनगरात काही ठिकाणी दुकानं बंद करण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला. काही ठिकाणी रास्ता रोकोही करण्यात आला. त्यावेळी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी जागोजागी कडक बंदोबस्त ठेवला आहे. चेंबूर परिसरात एका बसवर दगडफेक देखील करण्यात आल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला आता सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत असल्याचे वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. दगडफेक करणारे हे वंचितचे कार्यकर्ते नाहीत. पोलिसांनी त्याची चौकशी करावी, अशी मागणी आंबेडकर यांनीं केली आहे.

'वंचित'च्या बंदसंदर्भातल्या सर्व बातम्या वाचा येथे -

Live: घाटकोपरमध्ये 'वंचित'च्या महाराष्ट्र बंदला उस्फूर्त प्रतिसाद तर कुर्ल्यात हिंसक वळण

घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर 'वंचित'कडून रास्तारोकोचा प्रयत्न

Intro:मुंबई । सुधारित नागरिक कायदा आणि नवरत्न कंपन्या विकण्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने आज पुकारलेल्या बंदचा परिणाम मुंबईत काही ठिकाणी जाणवू लागला आहे. वंचित बहुजन आघाडीची ताकद असलेल्या विक्रोळी, मुलुंड, वरळी, चेंबूर याठिकाणी व्यापाऱ्यांनी दुकान बंद ठेवली आहेत.Body:उपनगरात काही ठिकाणी दुकान बंद करण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला. काही ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी जागोजागी कडक बंदोबस्त ठेवला आहे. चेंबूर परिसरात एका बसवर दगडफेक करण्यात आल्याचे वृत्त आहे.
24 जानेवारी रोजी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला आता सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत असल्याचे वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. दगडफेक करणारे हे वंचित चे कार्यकर्ते नाहीत.पोलिसांनी त्याची चौकशी करावी अशी मागणी आंबेडकर यांनीं केली आहे.Conclusion:
Last Updated : Jan 24, 2020, 12:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.