ETV Bharat / state

मुंबईत उद्यापासून गर्भवती महिलांचे लसीकरण, 35 केंद्रावर लसीकरण होणार - Mumbai pregnant news

मुंबई महापालिकेतर्फे गुरुवारपासून (दि. 15 जुलै) गर्भवती महिलांचे लसीकरण केले जाणार आहे. एखूण 35 लसीकरण केंद्रांवर गरोदर महिलांचे लसीकरण केले जाणार आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jul 14, 2021, 7:55 PM IST

मुंबई - कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे लसीकरणावर भर देण्यात आला आहे. विविध वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण केले जात आहे. 19 मे, 2021 पासून स्तनदा मातांच्या लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. त्यानंतर आता गुरुवारपासून (दि. 15 जुलै) गर्भवती महिलाचे लसीकरण केले जाणार आहे. एकूण 35 लसीकरण केंद्रांवर गरोदर महिलांचे लसीकरण सुरू केले जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

गर्भवती महिला, बाळाच्या बचावासाठी लसीकरण

कोरोना या आजाराचा संसर्ग होण्याचे प्रमाण इतर महिलांच्या तुलनेने गरोदर महिलांमध्ये अधिक होण्याची शक्यता असते. तसेच कोरोनाबाधित गरोदर महिलांमध्ये गरोदर काळ पूर्ण होण्यापूर्वी प्रसूती होण्याचे प्रमाण अधिक आहे. कोरोनाग्रस्त 90 टक्के गरोदर महिलांना दवाखान्यात दाखल होण्याची गरज भासत नाही. पण, सुमारे 10 टक्के गरोदर महिलांमध्ये गरोदरपणी मधुमेह, लठ्ठपणा, अधिक काळापासून असलेले श्वसनाचे आजार, प्रतिकार शक्ती विषयक औषधोपचार, डायलेसिस, हृदयरोग यामुळे कोरोनाचा तीव्र संसर्ग होण्याचे प्रमाण वाढते. तसेच अचानक तब्येत ढासळल्यास त्यांना अतिदक्षता विभागात भरती करण्याची आवश्यकताही भासू शकते. बाधित 95 टक्के गर्भवती महिलांची नवजात बालके सुस्थितीत जन्मतात. तर उर्वरित 5 टक्के नवजात बालके प्रसूतीच्या अपेक्षित दिनांकापूर्वी जन्माला येऊ शकतात. अशा बालकांच्या बाबत त्यांना रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता भासू शकते किंवा क्वचित प्रसंगी नवजात बालकाचा दुर्दैवाने मृत्यू ओढवू शकतो. या बाबींपासून गर्भवती महिलांचा आणि होणाऱ्या बाळाचा बचाव करण्यासाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करवून घेणे फायदेशीर ठरू शकते. या सर्व बाबी लक्षात घेऊन केंद्र सरकारने गर्भवती महिलांचे कोरोना लसीकरण करण्यासंदर्भात निर्देश दिलेले आहेत.

लसीकरणाबाबत सरकारचे निर्देश

मुंबईतील लसीकरण केंद्रात गर्भवती महिला गर्भधारणेनंतरच्या पूर्ण कालावधींतर्गत सदर लसीचा लाभ घेऊ शकतात. ज्या महिलांना कोरोना होऊन गेलेला असेल व ज्या महिलांना ‘मोनॉक्लोनल अँटीबोडीज’ किंवा प्लाज्मा हा उपचार घेतलेला असेल, अशा महिलांना 12 आठवड्यानंतर लसीकरण करून घेता येईल. लसीकरणानंतर, काही लाभार्थ्यांमध्‍ये सौम्य स्वरुपाचा ताप, इंजेक्शनच्या ठिकाणी दुखणं किंवा 1 ते 3 दिवस अस्वस्थ वाटण्याची भावना दिसून येऊ शकते. तुरळक स्वरूपात 1 ते 5 लाख लोकांमधील एखाद्या लाभार्थ्‍यास लसीकरणानंतर 20 दिवसापर्यंत गंभीर लक्षणे आढळून येऊ शकतात.

हेही वाचा - वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षे, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.