मुंबई - मुंबईतील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. शनिवारी 25 हजार 510 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 29 लाख 55 हजार 267 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
लसीकरणाची आकडेवारी-
मुंबईत एका दिवसात 25 हजार 510 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 23 हजार 045 लाभार्थ्यांना पहिला तर 2 हजार 465 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 29 लाख 55 हजार 267 लाभार्थ्यांना लस देण्यात आली त्यात 22 लाख 22 हजार 249 लाभार्थ्यांना पहिला तर 7 लाख 33 हजार 018 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 99 हजार 835 आरोग्य कर्मचारी, 3 लाख 57 हजार 595 फ्रंटलाईन वर्कर, 11 लाख 72 हजार 755 जेष्ठ नागरिक, 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार व इतर 10 लाख 45 हजार 5 तर 18 ते 44 वर्षामधील 80 हजार 77 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
लसीकरण मोहीम -
मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्करना लस दिली जात होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील वयोवृद्ध तसेच 45 ते 59 वर्षामधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. 1 मेपासून 18 ते 45 वर्षामधील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरु झाले आहे. सोमवार ते बुधवार जेष्ठ नागरिक तसेच दिव्यांग यांचे लसीकरण केले जाणार आहे. तर गुरुवार ते शनिवारपर्यंत कोविन ऍपवर नोंदणी करून मोबाईलवर संदेश आला असेल तरच लसीकरणाला या, असे आवाहन पालिकेने केले आहे. लसीच्या तुटवड्यामुळे शनिवार 15 मे आणि रविवार 16 मे असे दोन दिवस लसीकरण बंद होते. तर सोमवारी 17 मे ला तौक्ते चक्रीवादळामुळे लसीकरण बंद ठेवण्यात आले होते.