मुंबई - मुंबईतील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. गुरुवारी (दि. 24 जून) 64 हजार 378 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 48 लाख 59 हजार 538 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. गेले तीन दिवस रोज एक लाखांहून अधिक लसीकरण केले जात होते. मात्र, गुरुवारी त्यात घट पाहायला मिळत आहे.
लसीकरण मोहीम
मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्करना लस दिली जात होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील वयोवृद्ध तसेच 45 ते 59 वर्षामधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. 1 मे पासून 18 ते 45 वर्षामधील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरु झाले आहे. 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील लसीकरण सुरू झाले असले तरी राज्य सरकारच्या निर्णयानुसार 30 ते 44 वयोगटातील लसीकरण केले जात आहे. तसेच परदेशात जाणारे विद्यार्थी, कामानिमित्त परदेशात जाणारे नागरिक, ऑलम्पिकसाठी जाणारे खेळाडू यांचे लसीकरण केले जात आहे. स्तनदा माता आणि गरोदर महिलांचेही लसीकरण केले जात आहे.
एकूण लसीकरण
आरोग्य कर्मचारी - 3 लाख 15 हजार 444
फ्रंटलाईन वर्कर - 3 लाख 70 हजार 776
ज्येष्ठ नागरिक - 13 लाख 79 हजार 916
45 ते 59 वय - 14 लाख 37 हजार 418
18 ते 44 वय - 13 लाख 47 हजार 875
स्तनदा माता - 3 हजार 179
परदेशी शिक्षण विद्यार्थी - 4 हजार 922
मानसिक रुग्ण - 8
एकूण - 48 लाख 59 हजार 538
हेही वाचा - राज्यात रिकव्हरी रेटसोबतच मृत्यूदरातही वाढ! 24 तासांत 9 हजार 371 रुग्ण कोरोनामुक्त तर 197 जणांचा मृत्यू