ETV Bharat / state

'आधी विद्यार्थी आणि शिक्षकांना लस द्या, नंतच परीक्षा घ्या'

शिक्षक भारतीचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आधी लक्ष द्या आणि त्यानंतरच परीक्षा घ्या, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

kapil patil wrote letter to Uddhav Thackeray
आधी विद्यार्थी आणि शिक्षकांना लस द्या, नंतच परीक्षा घ्या
author img

By

Published : May 24, 2021, 8:23 PM IST

मुंबई - राज्य सरकार आणि मुंबई उच्च न्यायालयात इयत्ता दहावीच्या परीक्षा घेण्यावरून मतभेद निर्माण झाले आहेत. न्यायालयाने परीक्षा घेण्याचे म्हटले आहे, तर राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा घेतल्यास कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका होईल, असे म्हटले आहे. याबाबत अद्याप कुठला निर्णय झाला नसतानाच शिक्षक भारतीचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आधी लक्ष द्या आणि त्यानंतरच परीक्षा घ्या, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

शिक्षकांकडे दुर्लक्ष -

राज्यभरात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने हाहाकार माजवला आहे. या लाटेला थोपविण्यासाठी राज्य सरकारने कडक लॉकडाऊन लागू केला आहे. तसेच आरोग्य यंत्रणेवर ताण येत असल्याने राज्य शासनाने ताण कमी करण्यासाठी राज्यातील शिक्षकांना कोरोना ड्युटी लावली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात शिक्षकांना विलगीकरण कक्ष, सर्वेक्षण, चेक पोस्ट व अन्य ठिकाणी नियुक्त करण्यात आली आहे. अशा ठिकाणी कोरोना संसर्गाची शक्यता अधिक असते. तरी सुद्धा स्वतःच्या जीवाची काळजी न करता आपली सेवा देत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना ड्युटी लावलेला शिक्षकांचे तातडीने लसीकरण करण्याची मागणी सातत्याने शिक्षक संघटनाकडून करण्यात येत आहे. मात्र, राज्य सरकार यावर दुर्लक्ष करत आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यावरून गोधळ सुरु आहे. अशात शिक्षक भारतीचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी विद्यार्थ्यांना आधी लक्ष द्या आणि त्यानंतरच परीक्षा घ्या, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

150 हून अधिक शिक्षकांचा मृत्यू -

मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा फ्रंटलाईनवर्करमध्ये समावेश करुन त्यांना लस देण्याची मागणी मी सातत्याने करत आलेलो आहे. परंतु शासनाचे त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अनेक शिक्षक, कर्मचारी यांना आपले प्राण गमवावे लागले. प्रत्यक्ष कोविड ड्यूटी करत असताना 150 हून अधिक शिक्षक व कर्मचारी यांचे बळी गेले. तर कोरोनाची लागण होऊन मृत्यूमुखी पडलेल्या मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचारी यांची संख्या एक हजाराहून जास्त आहे. भारताचे माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी सरकारकडे शिक्षकांचा फ्रंटलाईनवर्करमध्ये समावेश करून लस देण्याची मागणी केली होती. तर आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाझेशनच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी शिक्षकांचा फ्रंटलाईनवर्करमध्ये समावेश करून लस देण्याबाबत सूचना केली आहे. मात्र, अद्यापही शासन याबाबत निर्णय घेत नसल्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष आहे. अशा काळात जर लस शिवाय परीक्षा घेतल्या, तर आपण लहानग्या विद्यार्थ्यांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आधी लक्ष द्या आणि त्यानंतरच परीक्षा घ्या, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा - सार्वभौम सुवर्णरोखे खरेदी करण्याची आहे संधी; जाणून घ्या, सविस्तर माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.