ETV Bharat / state

मेट्रोसाठी आरेमध्ये कारशेड बांधण्याचा हट्ट सोडा - शिवसेनेचा इशारा

मुंबईत सुरु होणाऱ्या मेट्रो कारशेडसाठी गोरेगांव आरे येथील तब्बल 2200 झाडे तोडण्याचा प्रस्ताव मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने वृक्ष प्राधिकरण समितीपुढे मंजुरीसाठी सादर केला होता. झाडे तोडण्यास शिवसेनेचा विरोध असल्याने वृक्ष प्राधिकरणाने हा प्रस्ताव फेटाळला होता. मेट्रोसाठी आरेमध्ये कारशेड बांधण्याचा हट्ट सोडून पर्यायी जागेचा विचार करावा, असे स्पष्ट मत स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव मांडले आहे.

मेट्रोसाठी आरेमध्ये कारशेड बांधण्याचा हट्ट सोडा - शिवसेनेचा इशारा
author img

By

Published : Aug 20, 2019, 8:51 PM IST

मुंबई - मुंबईत सुरु होणाऱ्या मेट्रो कारशेडसाठी गोरेगांव आरे येथील तब्बल 2200 झाडे तोडण्याचा प्रस्ताव मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने वृक्ष प्राधिकरण समितीपुढे मंजुरीसाठी सादर केला होता. झाडे तोडण्यास शिवसेनेचा विरोध असल्याने वृक्ष प्राधिकरणाने हा प्रस्ताव फेटाळला होता. आज वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्यांनी आरे येथे भेट दिली.

मेट्रोसाठी आरेमध्ये कारशेड बांधण्याचा हट्ट सोडा - शिवसेनेचा इशारा
यावेळी स्थानिक नागरिकांनी कोर्टात दोन केसेस प्रलंबित असल्याचे निदर्शनास आणले. या केसेसबाबतची माहिती पालिका प्रशासनाने द्यावी. मेट्रोसाठी आरेमध्ये कारशेड बांधण्याचा हट्ट सोडून पर्यायी जागेचा विचार करावा, असे स्पष्ट मत स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव मांडले आहे.यामुळे आरेमध्ये उभारण्यात येणाऱ्या कारशेडबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुंबईत मेट्रोचे जाळे उभारले जात आहे. मेट्रोच्या कारशेड उभारणीसाठी गोरेगांव येथील जागा निश्चित करण्यात आली आहे. कार शेडसाठी 2238 झाडे कापण्याचा प्रस्ताव मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीपुढे मंजुरीसाठी सादर केला आहे. झाडे मेट्रोसाठी उभारण्यात येणाऱ्या कार डेपोच्या बांधकामात अडथळा ठरत आहेत. ही झाडे कापण्यास शिवसेनेसह पर्यावरण प्रेमींकडून तीव्र विरोध होत असल्याने हा प्रस्ताव गेली दोन वर्ष रखडला आहे. दोन वर्षांनंतर मागील आठवड्यात हा प्रस्ताव वृक्षप्राधिकरण समितीपुढे पुन्हा मंजुरीसाठी आणण्यात आला होता. या प्रकल्पामुळे 27 आदिवासी पाडे विस्थापनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे आठवडाभरापूर्वी जागेची पाहणी केल्यावर निर्णय घेऊ, असे यशवंत जाधव यांनी सांगितले होते.त्यानुसार वृक्ष प्राधिकरण सदस्यांनी ठरल्याप्रमाणे आज आरे येथील जागेची पाहणी केली. या पाहणी दरम्यान स्थानिक नागरिकांचा आक्रोश आम्ही पाहिला. नागरिकांचा झाडे तोडण्याला विरोध आहे. त्याबाबत दोन खटले न्यायालयात सुरु आहेत.झाडे तोडण्याच्या विरोधात तब्बल 80 हजार तक्रारी पालिकेकडे आल्या आहेत. त्या तक्रारींना पालिकेने काय उत्तर दिले, याची सविस्तर माहिती पालिका प्रशासनाने वृक्ष प्राधिकरण समितीला दिलेली नाही. मेट्रो कार शेडबाबत त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. आरे कॉलनीत होणारी संभाव्य वृक्षतोड टाळण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीने दोन पर्याय सुचवले आहेत. कारशेडसाठी आरे कॉलनीऐवजी कांजुर मार्ग येथील जागेचा पर्याय सुचवण्यात आला आहे. आरे ऐवजी पर्यायी जागेवर कारशेड उभारावे असे यशवंत जाधव यांनी संगितले.

Intro:मुंबई - मुंबईत सुरु होणाऱ्या मेट्रो कारशेडसाठी गोरेगांव आरे येथील तब्बल 2200 झाडे तोडण्याचा प्रस्ताव मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने वृक्ष प्राधिकरण समितीपुढे मंजुरीसाठी सादर केला होता. झाडे तोडण्यास शिवसेनेचा विरोध असल्याने वृक्ष प्राधिकरण त्याबाबतचा प्रस्ताव फेटाळला होता. आज वृक्ष प्राधिकरण सदस्यांनी आरे येथे भेट दिली. यावेळी स्थानिक नागरिकांनी कोर्टात दोन केसेस प्रलंबित असल्याचे निदर्शनास आणले. या केसेसबाबतची माहिती पालिका प्रशासनाने द्यावी तसेच मेट्रोसाठी आरेमध्ये कारशेड बांधण्याचा हट्ट सोडून पर्यायी जागेचा विचार करावा असे स्पष्ट मत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव मांडले आहे. यामुळे आरेमध्ये उभारण्यात येणाऱ्या कारशेडबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.Body:मुंबईत मेट्रोचे जाळे उभारले जात आहे. मेट्रोच्या कारशेड उभारणीसाठी मुंबईत हिरवळ असलेल्या गोरेगांव येथील आरेची जागा निश्चित करण्यात आली आहे. कार शेडसाठी 2238 झाडे कापण्याचा प्रस्ताव मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीपुढे मंजुरीसाठी सादर केला आहे. ही झाडे मेट्रोसाठी उभारण्यात येणाऱ्या कार डेपोच्या बांधकामात अडथळा ठरत आहेत. ही झाडे कापण्यास शिवसेनेसह पर्यावरण प्रेमींकडून तीव्र विरोध होत असल्याने हा प्रस्ताव गेली दोन वर्ष रखडला आहे. दोन वर्षांनंतर मागील आठवड्यात हा प्रस्ताव वृक्षप्राधिकरण समितीपुढे मंजुरीसाठी आणण्यात आला होता. या प्रकल्पामुळे 27 आदिवासी पाडे विस्थापित होण्याचा, त्या पाढ्यातील नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आदिवास्यांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. यामुळे आठवडाभरापूर्वी जागेची पाहणी केल्यावर निर्णय घेऊ असे यशवंत जाधव यांनी सांगितले होते.

त्यानुसार वृक्ष प्राधिकरण सदस्यांनी ठरल्याप्रमाणे आज आरे येथील जागेची पाहणी केली. या पाहणीदरम्यान स्थानिक नागरिकांचा आक्रोश आम्ही पाहिला. नागरिकांचा झाडे तोडण्याला विरोध आहे. त्याबाबत दोन केसेस न्यायालयात सुरु आहेत. येथील 27 आदिवासी पाड्यांचे पुढे काय होणार ? झाडे तोडण्याच्या विरोधात तब्बल 80 हजार तक्रारी पालिकेकडे आल्या आहेत. त्या तक्रारींना पालिकेने काय उत्तर दिले. याची सविस्तर माहिती पालिका प्रशासनाने वृक्ष प्राधिकरण समितीला दिलेली नाही. मेट्रो कार शेडबाबत त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. आरे कॉलनीत होणारी संभाव्य मोठी वृक्षतोड टाळण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीने दोन पर्याय सुचविले असून, कारशेडसाठी आरे कॉलनीऐवजी कांजुर मार्ग येथील जागेचा पर्याय सुचविण्यात आला आहे. शिवसेनेचा झाडे तोडायला विरोध असल्याने आरे ऐवजी पर्यायी जागेवर कारशेड उभारावे असे यशवंत जाधव यांनी संगितले.

नेमका काय आहे प्रस्ताव -
अंधेरी पूर्व येथील आरे वसाहत येथील मेट्रो रेल्वे 3 प्रकल्पांतर्गत मेट्रो कार डेपोच्या प्रस्तावित बांधकामात अडथळा करणारी 2238 झाडे कापण्यास आणि 464 झाडे पुनर्रोपित करण्यास तसेच 989 झाडे आहेत तशीच ठेवण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने 21 जुलै 2017 रोजी प्रथम वृक्ष प्राधिकरणाला सादर केला होता. परंतु, यासंदर्भात पर्यावरणप्रेमींनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर ही झाडे कापण्याच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यात आला नव्हता.मात्र, न्यायालयाने यासंदर्भात पर्यावरण प्रेमी तसेच वृक्षप्रेमींचे म्हणणे ऐकून घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार 10 ऑक्टोबर 2018 रोजी लोकांकडून हरकती आणि सूचना जाणून घेण्यात आल्या. या हरकती आणि सूचनांचा अहवाल वृक्ष प्राधिकरणाने न्यायालयात सादर केला होता. तत्पूर्वी 21 सप्टेंबर 2018 रोजी या खात्यातील अधिकार्‍यांनी याची पाहणी केली होती. 4 जुलै 2019 रोजी व आज (20 ऑगस्ट रोजी) वृक्षप्राधिकरण सदस्यांनी पाहणी केली.

स्थायी समिती यशवंत जाधव यांचा बाईटConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.